Baramati News: बारामतीतून मोठी अपडेट! शरद पवार सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी 'सहयोग' सोसायटीत पोहोचले

Ajit Pawar Tribute News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही पक्षांच्या बाजूने विलिनीकरणाच्या चर्चा अद्यापही थांबल्या नसल्याचंच दिसून येत आहे. अशातच आता बारामतीतून एक मोठी राजकीय अपडेट समोर आली आहे.
Sunetra Pawar Ajit Pawar  Sharad Pawar .jpg
Sunetra Pawar Ajit Pawar Sharad Pawar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Baramati News: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनांनंतर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा हादरला बसला आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात विलिनि‍करणाच्या जोरदार चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच त्यांच्याकडे पुणे आणि बीडचं पालकमंत्रिपदही देण्यात आलं आहे. यानंतरही दोन्ही बाजूने विलिनीकरणाच्या चर्चा अद्यापही थांबल्या नसल्याचंच दिसून येत आहे. अशातच आता बारामतीत एक मोठी राजकीय अपडेट समोर आली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे बुधवारी(ता.4 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार आहेत.यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी सहयोग येथे पोहोचले होते.

दिवंगत अजितदादा पवार यांच्या शोकसभेसाठी पुन्हा एकदा बारामतीतील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी पवार कुटुंब एकत्र आल्याचे दिसून येत आहे. यावेळी शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी लोकांची सहयोग सोसायटी येथे रांग लागली आहे.

काहीवेळापूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत विद्या प्रतिष्ठान संस्थेमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला शरद पवारांसह पार्थ पवार, जय पवार आणि अजित पवारांची बहीण विजया पवार याही उपस्थित होत्या. ही बैठक कौटुंबिक असल्याचीही माहिती समोर आली होती. यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त पदावर अजितदादांनंतर पार्थ की जय पवार यांपैकी कोणाला संधी द्यायची याबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

Sunetra Pawar Ajit Pawar  Sharad Pawar .jpg
Chandrapur Mahapalika: चंद्रपूरच्या महापौर पदाबाबत मोठा निर्णय; काँग्रेसनं धानोरकरांसह वडेट्टीवारांचीही मर्जी राखली, असा काढला तोडगा

शरद पवार यांनी बारामतीत माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेवर भाष्य केलं होतं. संधी मिळाली, शपथ घेतली याचा आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना सुनावले. ते आमच्या चर्चेत नव्हते, त्यामुळे त्यांना विलिनीकरणावर भाष्य करण्याचा काही अधिकार आहे का? हे मला माहीत नसल्याचंही म्हटलं होतं.

Sunetra Pawar Ajit Pawar  Sharad Pawar .jpg
Saif Al-Islam Gaddafi: खळबळजनक! 42 वर्षे राज्य केलेल्या हुकुमशाहाच्या मुलाला निर्घृणपणे संपवलं; काही मिनिटांतच शरीराची अक्षरश: चाळणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com