Delhi Assembly Security Breach : राजधानीत मोठी खळबळ! दिल्ली विधानसभेत बॅरिकेडस् तोडत VIP गेटमधून कार आत घुसली, मुंबईत ATS ची मोठी कारवाई

Delhi Assembly Security Breach News: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून एक खळबळजनक उडवून देणारी बातमी सोमवारी (ता.6 एप्रिल) समोर येत आहे. दिल्ली विधानसभा परिसरात सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान देणारी धक्का घटना उघडकीस आली आहे.
Delhi Assembly .jpg
Delhi Assembly .jpgSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून एक खळबळजनक उडवून देणारी बातमी सोमवारी (ता.6 एप्रिल) समोर येत आहे. दिल्ली विधानसभा परिसरात सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान देणारी धक्का घटना उघडकीस आली आहे. एका कारनं व्हीआयपी प्रवेशद्वार असलेल्या गेट क्रमांक 2 वरील बॅरिकेड तोडत विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे गेल्यानं एकच धावपळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचा क्रमांक असलेल्या एका कारच्या चालकान मास्क घालत बेधुंद गाडी चालवत होता. या चालकानं थेट विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या कार्यालयाकडे गाडी नेली. तेथे पोहोचल्यावर या चालकानं दाखल पोर्चजवळ फुलांचा गुच्छ ठेवला आणि कार घेऊन घटनास्थळावरून पळून गेला.

सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास, संबंधित कारनं व्हीआयपी प्रवेशद्वार असलेल्या गेट क्रमांक 2 वरील बॅरिकेड तोडलं. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलिसांना घटनेची माहिती त्यांनी तातडीनं घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांकडून या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

दिल्ली पोलिसांकडून संबंधित कारचा शोध सुरू आहे. गेट क्रमांक 2 वर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मात्र,काही दिवसांपूर्वीच दिल्ली विधानसभेला बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर हीघटना घडल्यामुळे आता विधानसभेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात झाली आहे.

Delhi Assembly .jpg
Jyoti Waghmare : सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा, हातात संविधान... ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेतानाच थांबविले: राज्यसभेत काय घडलं?

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

दिल्लीत गेल्या नोव्हेंबर महिन्यात लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानं एकच खळबळ उडाली होती. याच दरम्यान,दहदशतवाद्यांकडून दिल्लीला पुन्हा टार्गेट करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. दिल्लीत टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत घातपात घडवण्याचा कट उधळण्यात आला आहे.

याप्रकरणी मुंबईतील कुर्ला येथून 18 वर्षांच्या दहशतवादी हमास सिद्दीकीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली स्पेशल सेल आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करत हमासला बेड्या ठोकल्या.

Delhi Assembly .jpg
Teacher Crime : महाराष्ट्रात आता मुलंही असुरक्षित, शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; क्लासच्या खोलीत नेलं अन्...

अटक करण्यात आलेला हमास सिद्दीकीच्या बाबतीत मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हमास काही लोकांच्या संपर्कात होता आणि दिल्लीत काहीतरी करण्याचा कट ते रचत होते, त्यात हमास सहभागी होता. पण त्याचे फोन कॉल्स खूप वाढले होते.तो बाहेर जाऊनही बराच वेळ बोलायचा असं त्याच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. यावरुन त्याला आम्ही खडसावल्याचंही सिद्दीकी यांच्या वडिलांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com