Ashok Kharat : काल CM फडणवीसांची घोषणा, आज खरातच्या मागे लगेच लागली ED ; मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल..

Ashok Kharat Case ED action : अशोक खरातच्या सर्व बेनामी मालमत्ता, जमीन खरेदी अशा सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी ईडीकडून केली जाणार असल्याची घोषणा काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती.
Ashok Kharat , Devendra Fadnavis
Ashok Kharat , Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat ED action : शेकडो महिलांवर लैगिंक अत्याचार व फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खरातवर आधीच १२ गुन्हे दाखल आहेत. एसआयटीकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. असे असताना आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ने या प्रकणात उडी घेतली आहे. खरातविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिकमध्ये बोलताना भोंदू अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं होतं. खरातच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सक्तवसुली संचालनालय (ईडी) करणार असून, प्राथमिक तपास सुरु केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर लगेचच सोमवारी खरातवर ईडीने थेट मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

खरात प्रकरण आता थेट ईडीने हातात घेतल्याने खरातसह अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी जमा केलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे ईडीने आपल्या ताब्यात घेतली आहे. अशोक खरातवर केवळ अत्याचाराचेच नाही, तर फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचे गंभीर आरोप असून ईडी आता या आर्थिक गैरव्यवहाराच्या मुळाशी जाणार आहे.

Ashok Kharat , Devendra Fadnavis
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात अंधारेंचा आजवरचा सर्वात मोठा आरोप; वरिष्ठ पोलीस अधिकारीच...; SITच्या तपासावर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

एसआयटीकडून आधीच याप्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. त्यात आता ईडीनेही एण्ट्री घेतली आहे. खरात मुंबईतून हवाला रॅकेट चालवत होता असा संशय व्यक्त केला गेला आहे. तसेच त्याने स्वत:सह कुटुंबियांच्या नावे कोट्यावधी रुपयांची माया जमवल्याचे समोर आले आहे. याशिवाय अशोक खरातने अनेक पतसंस्थांमध्ये आपली बँक खाती उघडली आहेत. या खात्यामधून कोट्यावधींचे व्यवहार झाले आहेत. खरात तब्बल 132 बँक खात्यांचा नॉमिनी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे.

Ashok Kharat , Devendra Fadnavis
Ashok Kharat Wife Story: लग्नानंतर 'हाय-फाय लाईफ स्टाईल'ची चटक लागली, खरातच्या फरार बायकोची धक्कादायक स्टोरी वाचाच...

शिर्डी पोलिस ठाण्यात जमीन खरेदी व्यवहारात फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही तपास यंत्रंणाना गुंगारा देत फरार झाली. कल्पना खरातला अटक करण्यासाठी नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तीन विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत. खरात दाम्पत्याचा मुलगा हर्षवर्धन हा देखील नॉट रिचेबल आहे. त्याची पोलिसांनी चौकशी केली होती, मात्र त्यानंतर तो अचानक गायब झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com