Pune Medical College: मोठी बातमी! पुण्याला मिळालं आणखी एक मेडिकल कॉलेज; केंद्राची मंजुरी, MBBS च्या वाढणार जागा

Pune Medical College: पुण्यात आणखी एका नव्या मेडिकल कॉलेजला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्यामुळं पुणे शहरासाठी एमबीबीएसच्या आणखी जागा वाढणार आहेत.
Pune New Medical College Sanction by Union Government
Pune New Medical College Sanction by Union Government
Published on: 
Updated on: 

Pune Medical College: पुण्यात आणखी एका नव्या मेडिकल कॉलेजला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्यामुळं पुणे शहरासाठी एमबीबीएसच्या आणखी जागा वाढणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणयवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळं शैक्षणिक केंद्र म्हणून पुण्याची ओळख आणखी घट्ट होणार आहे.

कुठे असणार नवं कॉलेज?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, महाराष्ट्र आणि पुण्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुण्याला एक नवं मेडिकल कॉलेज मिळालं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं पुण्यासाठी ५० एमबीबीएसच्या जागा असणाऱ्या मेडिकल कॉलेजसाठी मंजुरी दिली आहे. हे नवं कॉलेज बिबवेवाडी येथील ESIC हॉस्पिटलमध्ये उभारलं जाणार आहे. त्यामुळं आता २०२७-२८ पासून पुण्यातील हे नवं मेडिकल कॉलेज कार्यरत होणार आहे.

Pune New Medical College Sanction by Union Government
Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना दिवाळी गिफ्ट! २,००० रुपये थेट खात्यात जमा होणार

दोनदा प्रस्ताव नाकारला

यापूर्वी दोनदा पुण्यातील ESIC हॉस्पिटलला मेडिकल कॉलेज करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. पण तो दोन्ही वेळा मेडिकल काऊन्सिलकडून नाकारण्यात आला होता. यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांकडं आपण अपिल दाखल केलं होतं, आजचं हे अपिल त्यांनी मान्य केलं आहे. त्यामुळं पुणेकरांची मागणी पूर्ण झाली आहे, यासाठी पुण्याचे लोकप्रतिनिधी मुरलीधर मोहोळ, माधुरी मिसाळ आणि चंद्रकांत पाटील हे सातत्यानं प्रयत्न करत होते, असंही मुख्यमंत्र्यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं.

नवरात्रीचं गिफ्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी महाराष्ट्राला हे नवरात्रीचं गिफ्ट दिलं आहे. यामुळं अनेक एमबीबीएस करु इच्छिणाऱ्या विद्यार्त्यांचं स्वप्न साकारण्यासाठी मदत होणार असून महाराष्ट्राला आणखी डॉक्टर्सही मिळणार आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com