J.P. Nadda News : भाजपचे नड्डा आरतीला आले, शहराध्यक्ष धीरज घाटेंच्या मंडळात आग लागली

Pune Political News : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा शहराध्यक्ष धीरज घाटेंच्या सानेगुरूजी मंडळाच्या आरतीसाठी आले होते.
J.P. Nadda News
J.P. Nadda NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मुंबई, पुण्यातील गणेश मंडळांच्या भेटीकरिता महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी मंगळवारी सकाळी मुंबईतील लालबागचा राजा आणि केशवजी नाईक चाळीतील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपतीचेही त्यांनी दर्शन घेतले. यानंतर ते पुण्यात दाखल झाले.

या पुणे दौऱ्यावेळी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर ते सायंकाळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे(Dheeraj Ghate) यांच्या सानेगुरुजी मंडळाच्या दर्शन आणि आरती करण्यासाठी आले होते. मात्र, याचवेळी देखाव्यातील मंडपाच्या कळसाला आग लागली. त्यामुळे नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले. यावेळी एकच धावपळ उडाली.

J.P. Nadda News
Adarsh Society Scam : आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणी १९ जणांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश..

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा शहराध्यक्ष धीरज घाटेंच्या सानेगुरूजी मंडळाच्या आरतीसाठी आले होते. यंदा घाटेंच्या मंडळाकडून उज्जैनच्या महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्या मंदिराच्या कळसाला आग लागली. त्यामुळे नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले. पाऊस सुरू झाल्यामुळे आग काही मिनिटांत विझली. यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(J.P.Nadda) मंगळवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांचं सकाळी दहा वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतले. यावेळी फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासह इतर भाजपचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. गिरगावच्या केशवजी चाळ परिसरामध्ये जे. पी. नड्डा यांचं जल्लोषात स्वागत केलं. नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जात गणरायाचं दर्शन घेतलं.

पुण्यात आंबील ओढा कॉलनी नजीक साने गुरूजीनगर येथे एका गणपती मंडळाने सजावट केलेल्या मंदिराच्या वरील बाजूस आग लागली होती. अग्निशमन दलाकडून दोन फायरगाड्या व एक वाॅटर टँकर घटनास्थळी पोहोचला असून आग आटोक्यात आहे. जखमी वा जीवितहानी नाही. पुणे शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले. (Latest Marathi News)

(Edited By Deepak Kulkarni)

J.P. Nadda News
Wablewadi School News : वारे गुरुजींनी वाबळेवाडी यात्रेतील तमाशा बंद केला अन्‌ राज्यातील पहिली टॅबलेट शाळा बनवली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com