

Jay Pawar speech at baramati election: अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. यासाठी अजितदादांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आज बारामतीत महायुतीतील सर्व प्रमुख नेते त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली.
यावेळी भाषणाची सुरुवात अजितदादांचे धाकडे पुत्र जय पवार यांनी केली. भाषण करताना त्यांनी दादांच्या अनेक आठवणी सांगितल्या तसंच बारामतीकर आणि राज्यातील जनतेसाठी अजित पवारांनी कशा पद्धतीनं केलं हे देखील सांगितलं. भाषण करताना ते भावूक झाले अन् अजित पवारांनी जाता जाता इतिहास घडवला असं सांगितलं.
जय पवार म्हणाले, शाळेत असताना मी अजितदादांना विचारायचो की तुम्ही रोज रात्रंदिवस काम करता. थोडं कुटुंबाला वेळ द्या, त्या काळात मला ते एवढं कळलं नाही पण ते मला म्हणाले जयड्या संपूर्ण बारामतीकर हे माझं कुटुंब आहे.
तसंच संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हे देखील माझं कुटुंब आहे. पण आज मला कळतंय की दादा माझ्यासाठी एवढं मोठं कुटुंब सोडून गेले आहेत. त्यामुळं आपण यावेळी इतिहास घडवू शकतो. हे सांगताना जय पवार भावूक झाले.
दरम्यान, पुढे बोलताना जय पवार म्हणाले की, खरं सांगायला गेलं तर जाता जाता दादा इतिहास घडवून गेले, कारण वहिनींना त्यांच्यामुळं राज्यातील पहिली महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. आज दादा जिथं असतील तिथं एका आशेनं आपल्या सर्वांकडं बघत असतील. अनेक वर्षांपासून मी माझ्या बारामतीकडून रात्रंदिवस झटलो. पण आज आपण सर्वजण इतिहास घडवू शकतो.
गावोगोवी फिरताना अनेक पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की, तुमच्या मित्र पक्षातील सहकारी ज्येष्ठ नेते प्रचारासाठी येत आहेत तसंच तुमच्या कुटुंबातील लोकही प्रचारासाठी येत आहेत. मी त्याना सांगितलं की, दादांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. दादांचं योगदान महाराष्ट्रभर भरपूर होतं. दादांनी सगळ्यांना एकत्र घेऊन काम केलं. त्यामुळं जर ही निवडणूक बिनविरोध झाली असतील तर दादांसाठी ही खरी आदरांजली झाली असती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.