Assembly Winter Session : कर्नाटक सरकारचा शेतकरीहिताचा निर्णय; महाराष्ट्रातील बळिराजाचे अधिवेशनाकडे डोळे

Karnataka Government's Decision : अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन लाख रुपयांवरील कर्ज भरल्यास उर्वरीत दोन लाख रुपये कर्ज माफ करण्यात येईल, असे जाहीर केले होते.
Siddaramaiah-Ajit Pawar-Eknath Shinde -Devendra Fadnavis
Siddaramaiah-Ajit Pawar-Eknath Shinde -Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Belgaum News : कर्नाटक सरकारने विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सहकारी बॅंकांमधील मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाचे केवळ मुद्दल भरल्यास त्यावरील संपूर्ण व्याज माफ करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकार कोणती घोषणा करतेय, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Karnataka Government's decision in interest of farmers; State's focus on Maharashtra convention)

दरम्यान, कर्नाटकातील मागास ११४ तालुक्यांच्या विकासासाठी नेमलेल्या नंजुंडाप्पा अहवालाची अंमलबजावणी आणि परिणामांचा अभ्यास करण्यासाठी अर्थतज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन केली जाईल, असेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Siddaramaiah-Ajit Pawar-Eknath Shinde -Devendra Fadnavis
Hatkanangale Election : हातकणंगले उपनगराध्यक्ष निवडीत व्हीप डावलला; महाआघाडी काय भूमिका घेणार?

बेळगावात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत उत्तर कर्नाटकाबाबत आयोजित केलेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेतकऱ्यांबाबत ही घोषणा केली आहे.

या अधिवेशनात विरोधी पक्षनेते अशोक यांनी सहकार बॅंकेतील शेतकऱ्यांची २ लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला अनुसरून कर्नाटक सरकारने शेतकरी दीर्घ आणि मध्यम मुदतीचे मुद्दल भरले, तर सरकार त्या कर्जावरील संपूर्ण व्याज माफ करेल, अशी घोषणा केली आहे.

Siddaramaiah-Ajit Pawar-Eknath Shinde -Devendra Fadnavis
Onion Export Ban Issue : ‘शुगर लॉबी’पुढे सरकार झुकले; कांदा उत्पादक वाऱ्यावर...

कर्नाटकातील सिंचन प्रकल्प, दुष्काळासह रोजगार योजनांबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. मात्र, गेली एक ते दीड महिन्यापासून वेळ मिळत नाही, असेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी भाजप आमदारांनी सहकार्य करावे, असे आवाहनही सिद्धरामय्या यांनी केले.

Siddaramaiah-Ajit Pawar-Eknath Shinde -Devendra Fadnavis
Babajani Durrani News : अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना सरकारचे 'अभय'

दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात आले होते. तसेच, विद्यमान अर्थमंत्री अजित पवार हे त्यावेळीही अर्थमंत्री होते, त्यावेळी त्यांनी दोन लाख रुपयांवरील कर्ज भरल्यास उर्वरीत दोन लाख रुपये कर्ज माफ करण्यात येईल असे सांगितले हेाते. सध्या राज्यातील शेतकरी दुष्काळ, गारपीठ आणि अवकाळी पावसामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच निर्यात बंदीमुळे कांद्याचे बाजारभावही कोसळले आहेत, त्यामुळे संकटातील शेतकऱ्यांसाठी दोन लाखांच्या वरील कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी होणार का, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

Siddaramaiah-Ajit Pawar-Eknath Shinde -Devendra Fadnavis
Assembly Winter Session : भुजबळ, वडेट्टीवार, जरांगेंनी महाराष्ट्र एकसंध ठेवावा; आमदार लांडगेंची कळकळीची विनंती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com