चंद्रकांतदादा म्हणतात; सवाई गंधर्व महोत्सवावरील बंधन उठवा

पोलीस आयुक्त गुप्ता यांच्याकडे मागणीचे निवेदन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिले.
 चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील सरकारनामा
Published on
Updated on

पुणे : सवाई गंधर्व महोत्सवाला (savai Gandhra) ५० टक्के उपस्थितीची परवानगी द्यावी तसेच शनिवारवाडादेखील कार्यक्रमासाठी खुला करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant Patil) यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली.

 चंद्रकांत पाटील
पुणे पालिकेतील पदोन्नती घोटाळ्यात ‘आप’ची पोलिसांकडे धाव

पोलीस आयुक्त गुप्ता यांच्याकडे मागणीचे निवेदन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिले. ५० टक्के उपस्थितीची मागणी मान्य झाल्यास पुणेकरांना या महोत्सवाचा आनंद घेता येईल,असे मत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केले. पुणेकर सुजाण आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा महोत्सव चांगल्याप्रकारे पार पाडतील, असा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला.

 चंद्रकांत पाटील
पुणे महानगरपालिका : सातवा वेतन आयोग मिळाला पण...

एल्गार परिषदेनंतर कोणतेही संयुक्तिक कारण नसताना शनिवारवाड्यावर सरसकट कार्यक्रम करण्यास परवानगी नाकारली जाते हे अयोग्य असल्याने त्याबाबतही निर्णय घ्यावा, असे आग्रही मत पाटील यांनी व्यक्त केले.या विषयावरदेखील पोलीस आयुक्त गुप्ता सकारात्मक असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com