Pimpri-Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमध्ये 'सावरकर गौरव यात्रे'च्या तारखेत बदल

Bjp News : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी निघणार यात्रा
Pimpri-Chinchwad
Pimpri-ChinchwadSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pimpri-Chinchwad : सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) भाजप आज (ता.२) शहरातील भोसरी, चिंचचवड आणि पिंपरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात 'सावरकर गौरव यात्रा' काढणार होती. मात्र, आता ती ९ तारखेला निघणार आहे.

२९ मार्चला याबाबतची घोषणा शहर भाजपने केली होती. मात्र, त्याच दिवशी पक्षाचे पुण्याचे पक्षाचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे निधन झाले. त्यामुळे ही यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या काल रात्री शहर कार्यालयात झालेल्या बैठकीत ही यात्रा आता ९ एप्रिलला काढण्याचे ठरले. त्याच दिवशी पुण्यातही ती निघणार आहे.

Pimpri-Chinchwad
Shivsena News : शिवसेनेचा राम म्हणून ओळख असलेल्या माजी जिल्हाप्रमुखांचा अखेर ‘जय महाराष्ट्र’ : भाजपत प्रवेश करणार

चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप आणि उमा खापरे (विधानपरिषद सदस्य) अशा पक्षाच्या शहरातील दोन्ही आमदार कालच्या बैठकीला उपस्थित होत्या. मात्र, तिसरे शहराध्यक्ष आमदार भोसरीचे महेश लांडगे हे घशाला त्रास होत असल्यामुळे नव्हते.

Pimpri-Chinchwad
NCP Sarpanch Murdered : NCP सरपंच प्रवीण गोपाळे खूनप्रकरणी मोठी अपडेट ; चार संशयित ताब्यात.

पक्षाच्या ६ तारखेच्या ४३ व्या वर्धापनदिनाच्या आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या (ता.१४) तयारीवर यावेळी चर्चा झाली, अशी माहिती शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी आज प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली. शहर सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गेंसह माजी नगरसेवक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.