Chinchwad By-Election : 'लक्ष्मण जगतापांच्या वाढदिवशीच, जयंती साजरी करण्याची वेळ !'

Laxman Jagtap : तुमच्या नावापुढे आज स्वर्गीय शब्द लावताना काळीज जड होत आहे..
Chinchwad By-Election : Laxman Jagtap
Chinchwad By-Election : Laxman Jagtap Sarkarnama

पिंपरी : ज्यांच्या निधनामुळे चिंचवडची पोटनिवडणूक येत्या २६ तारखेला होत आहे, ते चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचा आज (ता.१५) वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी अश्विनी जगताप आणि कन्या ऐश्वर्या रेणूसे यांना भावनांना आवर घालणे कठीण गेले.

"तुमच्या नावापुढे आज स्वर्गीय शब्द लावताना काळीज जड होत होते," अशी अश्विनी जगताप यांनी, तर वाढदिवसाला जयंती साजरी करण्याची वेळ आल्याची भावना ऐश्वर्या रेणूसे यांनी व्यक्त केली. वाढदिवसाला जयंती कशी साजरी करायची, अशी विचारणा ऐश्वर्याने केली. त्यांच्या संस्कारांचा, विचारांचा वारसा आम्ही पुढे चालविणार असल्याचे तिने सांगितले.

Chinchwad By-Election : Laxman Jagtap
Kasba By-Election News : कसब्यात प्रचाराची रणधुमाळी अन् फडणवीस बापटांच्या भेटीला

लक्ष्मण जगतापांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या धडाक्यात विविध सामाजिक उपक्रमांव्दारे साजरा केला जात होता. मात्र, गेल्या महिन्यात ३ तारखेला त्यांचे निधन झाल्याने त्यांचा यावेळचा वाढदिवस हा स्मृतीदिन म्हणून पाळला गेला. विविध राजकीय पक्ष, संघटनांनी पिंपळेगुरव येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांनाअभिवादन केले.

भाजपने अश्विनी जगताप यांना चिंचवड विधानसभा पोटनिवडणकीची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रचारातच पतीची जयंती साजरी करण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्या ही कुटुंबासोबत सकाळी पतीच्या स्मृतीस्थळावर गेल्या. तेथे डोके टेकवून त्यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली.

Chinchwad By-Election : Laxman Jagtap
Kasba By-Election : कसब्यात मनसे-राष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपली : 'ट्विटर वॉर' सुरूच..

शहराच्या इतिहासातील ‘सुवर्ण लक्ष्मण पर्ण’ सदैव स्मरणात राहील : आ. लांडगे

पिंपरी-चिंचवड शहराची ओळख जागतिक स्तरावर व्हावी, ‘स्मार्ट सिटी’म्हणून शहराचा लौकीक व्हावा, याकरिता कायम सकारात्मक पुढाकार घेणारे दिवंगत आ.लक्ष्मण जगताप यांचे कार्य उद्योगनगरीच्या इतिहासातील ‘सुवर्ण लक्ष्मण पर्ण ’ म्हणून सदैव स्मरणात राहील, अशी भावना भाजपचे शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली. जगतापांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com