Pune Municipal PWD dispute: महापालिका अन् सार्वजनिक बांधकाम विभागाचा वादात अडकलेल्या भुयारी मार्गासाठी आता सीएम फडणवीस मैदानात; लक्षवेधी मांडताच, 'पंधरा दिवसांत...'

Political News : शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या पेठांमध्ये वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने एक महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, आराखडा तयार करण्यास अधिकाऱ्यांकडून विलंब होत असल्याने आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या पेठांमध्ये वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने एक महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबागच्या ते शनिवारवाडा दुहेरी भुयारीमार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मात्र, हा आराखडा करण्यास विलंब होत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यास अधिकाऱ्यांकडून विलंब होत असल्याने आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली असून येत्या पंधरा दिवसांमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यासंदर्भात बैठक घेणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Devendra Fadnavis
BJP Politics: वाढती इनकमिंग भाजपची चिंता वाढवणारी; आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का? कार्यकर्त्यांच्या भावना

हिवाळी अधिवेशनात आमदार हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी भुयारी मार्ग प्रकल्पाच्या डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) तयार होण्यातील दिरंगाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दालनात झालेल्या बैठकीत बांधकाम विभागाला हा अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात बांधकाम विभागाने जबाबदारी महापालिकेवर ढकलली. या दोन्ही विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे प्रकल्पाचा आराखडा रखडला असल्याची खंत आमदार रासने यांनी व्यक्त केली.

Devendra Fadnavis
Shivsena UBT Dispute : पुरुषोत्तम बरडे शिवसेनेच्या बैठकीकडे फिरलेच नाहीत; पण खैरे म्हणतात, ‘दासरींसोबतचा वाद मिटला...’

दरम्यान, 'यशदामध्ये शहराच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत भुयारी मार्गांचा प्रकल्प अहवाल महापालिकेला तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, महापालिकेने आपल्याकडे ही यंत्रणा नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तो तयार करण्याचे पत्र दिले. दोन्ही प्रशासनामध्ये संभ्रम असल्याने नक्की काम कोणी करायचे या संदर्भात आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील पंधरा दिवसांत बैठक घेणार आहेत', अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली.

Devendra Fadnavis
Pune NCP : महापालिका निवडणुकीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं टार्गेट लाडकी बहीण नव्हे तर 'Gen Z'

गणेशोत्सव मंडळांवर दाखल झालेले खटले मागे घ्या

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनिक्षेपकांच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या काही मंडळांमुळे पोलीसांनी 250 ते 300 मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र चुकी फक्त मोजक्यांची असताना सर्व कार्यकर्त्यांना शिक्षा होणे योग्य नाही, असे मत रासने यांनी मांडले. गणेशोत्सवासाठी वर्षभर अथक मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत सरकारने हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सभागृहात केली.

Devendra Fadnavis
Shivsena UBT Dispute : पुरुषोत्तम बरडे शिवसेनेच्या बैठकीकडे फिरलेच नाहीत; पण खैरे म्हणतात, ‘दासरींसोबतचा वाद मिटला...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com