Congress high command decision : काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे नाराजीनामा अस्त्र; हायकमांडने घेतलेला 'तो' निर्णय केला रद्द !

Congress office-bearers revolt News : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहर काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्याच्या तयारीत असताना ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे पक्षाला माघार घ्यावी लागली आहे.
Congress Politics
CongressSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसने पुण्यामध्ये मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसमध्ये नेहमीच दिसून येणाऱ्या नाराजीनाट्यामुळे काँग्रेस हायकमांडने तूर्तास तरी हा निर्णय मागे घेतला असल्याचे सांगितले जात आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहर काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्याच्या तयारीत असताना ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे पक्षाला माघार घ्यावी लागली आहे. दोन शहराध्यक्ष नेमण्याचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींनी मांडला होता, मात्र काही जुन्या नेत्यांनी राजीनाम्याचा इशारा दिल्याने हा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे.

या निर्णयानुसार पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघ दोन गटांत विभागले जाणार होते. एका शहराध्यक्षाकडे वडगाव शेरी, हडपसर, शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट तर दुसऱ्या शहराध्यक्षाकडे खडकवासला, कोथरूड, पर्वती आणि कसबा पेठ असे चार-चार मतदारसंघ देण्यात येणार होते. या रचनेमुळे प्रत्येक शहराध्यक्षाला आपापल्या भागातील प्रभाग निवडणुकीवर लक्ष केंद्रित करता आले असते, असा दावा पक्षातील काही नेत्यांकडून करण्यात येत होता.

Congress Politics
BJP Crisis : भाजपमध्ये भूकंप! ‘शिवसेनेच्या खुंटीला पक्ष बांधला’ म्हणत 50 पदाधिकाऱ्यांचा एकत्रित राजीनामा, आणखी बंडाची चिन्हे

गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला. “नवीन नेते आणण्याऐवजी जुन्याच चेहऱ्यांना बाजूला करून नव्यांना संधी देण्याचा प्रयत्न आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. काहींनी तर थेट राजीनामा देण्याची धमकी दिली. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत बंडखोरी होऊ नये, यासाठी हा प्रस्ताव तात्पुरता बाजूला ठेवण्यात आल्याची माहिती पक्षातील काही वरिष्ठांनी दिली आहे.

Congress Politics
Shivsena News : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का; महिला जिल्हाध्यक्षांचाच भाजपमध्ये प्रवेश!

सध्या पुणे शहर काँग्रेसचे (Congress) प्रभारी अध्यक्ष म्हणून अरविंद शिंदे काम पाहात आहेत. यापूर्वी रमेश बागवे यांनी शहराध्यक्षपद सोडले होते. पाच वर्षांहून अधिक काळ पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी पदे रिक्त करावीत, असा पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्यानंतर बागवे यांनी राजीनामा दिला होता.

Congress Politics
NCP SP Politics : शरद पवारांच्या पक्षाकडून अजित पवारांचे नाव घेत कोट्यावधींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप

आता पूर्णवेळ शहराध्यक्ष नेमण्याची मागणी जोर धरू लागली होती, त्यातूनच दोन शहराध्यक्ष नेमण्याचा मधला मार्ग काढला गेला होता. पण तोही बारगळल्याने सध्याचे नेते म्हणजेच जुने चेहरे पुन्हा सक्रिय राहणार हे निश्चित झाले आहे. गेल्या 2022 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला केवळ 9 जागांवर यश मिळाले होते.

Congress Politics
Congress Leader News : युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भावाचा पालिका निवडणुकीत राजकीय गेम...कोणी फिरवली सूत्रे?; चर्चांना उधाण

यंदा प्रभाग रचनेमुळे अनेक दिग्गज नेत्यांच्या बालेकिल्ल्यातील मतदारसंख्या विभागली गेली आहे. नव्या रचनेतून चांगली कामगिरी करता येईल, असा विश्वास पक्षातील काही कार्यकर्ते व्यक्त करत होते. आता जुन्याच नेत्यांना मैदानात उतरवावे लागणार असल्याने “मतदार पुन्हा जुन्या चेहऱ्यांना साथ देतील का?” असा प्रश्न पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे. एकूणच, संघटनेत नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न अंतर्गत विरोधामुळे रखडला असून, पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा जुन्याच नेत्यांच्या बळावर लढावे लागणार हे स्पष्ट झाले आहे.

Congress Politics
BJP major decision : 'स्थानिक'च्या निवडणुकीपूर्वीच भाजप मोठा निर्णय घेणार; CM फडणवीसांनीच दिले संकेत,अनेक नेत्यांच्या पोटात गोळा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com