Devendra Fadnavis on Sanjay Raut : ...कोणी फार मोठे नेते आहेत का ? फडणवीसांचा राऊतांना टोला

Attack on Nikhil Vagale : निखील वागळेंवरील हल्ल्यावरुन केलेल्या टीकेला प्रत्युत्तर.
Devendra Fadnavis, Sanjay Raut
Devendra Fadnavis, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Alandi News : पुण्याचे नवे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी चार्ज घेताच लगेच शहरातील नामचीन गुंडाची परेड केल्याने त्याची चर्चा झाली. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर पुण्यात भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यावरुन उद्धव ठाकरे शिवसेनेचे संजय राऊत यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यावर टीका केली.

तर तशीच परेड निखील वागळे यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांची केली तर तुम्ही 'सीपी'. नाहीतर भाजपचे कार्यकर्ते, असे आव्हानही दिले होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते कोणी फार मोठे नेते आहेत का ? असा टोला राऊतांना लगावला आहे. ते आळंदी येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते.

Devendra Fadnavis, Sanjay Raut
Devendra Fadnavis Resign : फडणवीसांवर राजीनाम्यासाठी वाढतोय दबाव; गोळीबार-हत्या-राड्याच्या विरोधात आंदोलन!

निखील वागळे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर संजय राऊत म्हणाले, पुण्याचे नवे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी चार्ज घेताच लगेच शहरातील नामचीन गुंडाची परेड केल्याने त्याची चर्चा झाली. राजकीय गुंडांची सुद्धा पुण्यातील रस्त्यावरुन परेड करुन दाखवा. पुणे पोलिसांनी गुंडाची केलेली परेड हा मोठा शो आणि नौटंकी असून ती बंद करा आणि वागळेंवर हल्ला केलेल्यांना हातकडी घालून पुण्यातील रस्त्यावरून फिरवा.

तरच तुम्ही सीपी. नाहीतर भाजपचे कार्यकर्ते, असे आव्हानही राऊत यांनी आयुक्त अमितेशकुमार यांना दिले. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत टोला लगावला. ते म्हणाले, "कोण संजय राऊत, कोण आहेत ते. कोणी फार मोठे नेते आहेत का ? योग्य नेते असतील तर त्यांच्याबद्दल मला विचारायचं. संजय राऊतबद्दल काय विचारतायं."

Devendra Fadnavis, Sanjay Raut
Uddhav Thackeray News : कर्नाटक सरकारनंतर ठाकरेही गरजले; सत्ता आल्यानंतर ‘तो’ कायदा बदलणार...   

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com