BJP politics : मोदी-शहांच्या भांडणात फडणवीस पंतप्रधान होतील? ठाकरेंच्या नेत्याचा गौप्यस्फोट

BJP prime ministerial candidate : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर आता त्यांच्यानंतर पुढचा भाजपचा पंतप्रधानपदाचा दावेदार कोण असेल? याबाबतच्या चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळतात.
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Amit Shah, Narendra Modi
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Amit Shah, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 28 Jan : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर आता त्यांच्यानंतर पुढचा भाजपचा पंतप्रधानपदाचा दावेदार कोण असेल? याबाबतच्या चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने काही नावे समोर येतात, ज्यामध्ये अमित शाह, नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा समावेश असतो.

मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shivsena UBT) नेत्या सुषमा अंधारे यांनी आगामी काळात देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार असतील, असा गौप्यस्फोट केला आहे. तसेच अमित शाह हेच केंद्र सरकारला अस्थिर करण्याचं काम करत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे (Sushma andhare) म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आता मुख्यमंत्रिपदाच्या तीन टर्म भोगून झाल्या आहेत. आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देऊन पंतप्रधानपदाचे दावेदार झाले तर त्यात आश्चर्य वाटणार नाही. सध्या जे राजकीय वातावरण दिसत आहे.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Amit Shah, Narendra Modi
Krishna Andhale : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीबाबत शरद पवारांच्या आमदाराचा खळबळजनक दावा; म्हणाले, "तो आता..."

त्यावरून राज्यातील सरकार अस्थिर होईल का? नाही हे माहीती नाही. मात्र केंद्रातील सरकार अस्थिर होण्याची शक्यता दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची वेगळी लाईन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची वेगळी लाईन असं सध्याचे चित्र दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात देवेंद्र फडणवीस हे शाह यांच्यासह मोदींना देखील पंतप्रधानपदासाठी आव्हान देऊ शकतात.

बिहार निवडणुकीत चिराग पासवान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्याची शाह यांची इच्छा आहे. ही इच्छा अमित शहांनी (Amit Shah) पुढे आणल्यास बिहाचे मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार हे केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतील आणि हीच इच्छा अमित शहांची आहे. शहांनाच केंद्र सरकार अस्थिर करायचा आहे, असा मोठा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

त्यापुढे म्हणाल्या, या सगळ्या घटनाक्रमाकडे मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) हे अपेक्षित लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे राज्यांमधील चाललेल्या घडामोडींकडे त्यांच लक्ष नाही. शाह केंद्रातील सरकार अस्थिर करणार आहेत. कारण नरेंद्र मोदींची एकाधिकारशाही त्यांना पटत नाही. त्यामुळे ते या सगळ्या गोष्टी करत असल्याचं त्या म्हणाल्या.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Amit Shah, Narendra Modi
Shivsena Politics : दानवेसाहेब, तुम्हीही चला आमच्यासोबत शिंदेसाहेंबाच्या शिवसेनेत! 'नगरी' शिवसैनिकांसमोर ठाकरेंच्या शिलेदाराची बोलती बंद

तर केंद्रातील सरकार अमित शहांना अस्थीर करायचं असून मोदींना बाजूला करून अमित शाह हे पंतप्रधानपदासाठी प्रयत्न करतील. मात्र दोघांच्या भांडणात फडणवीस पंतप्रधानपदाची खुर्ची आपल्याला मिळेल का? यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा अंधारे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com