केंद्रीय यंत्रणा पवारांची पाठ सोडेनात, दौंड शुगर्सच्या संचालकांच्या घरी छापेमारी

ईडीचे पथक पुणे नंतर बारामती मध्येही जाणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय तपास यंत्रणा पाठ सोडताना दिसत नाहीत. आता अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे. ते सध्या दौंड शुगरचे संचालक आहेत. ईडीचे पथक पुणे नंतर बारामती मध्येही जाणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

Ajit Pawar
अजित पवार म्हणाले; नो कॉमेन्टस् म्हणण्याचा आधिकार मला आहे की नाही

अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने व कंपन्यांवरील कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात सध्या अस्वस्थता आहे. याआधीही काटेवाडीमध्ये ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली होती.

त्यावेळी "तपास यंत्रणांना काही शंका असेल तर छापे टाकण्याचा त्यांना अधिकार आहे. पण ही कारवाई राजकीय हेतूने होत असेल तर लोकांनी हे लक्षात घ्यावे. कारण, अर्थाअर्थी कोणताही संबंध नसलेल्या माझ्या तीन बहिणींच्या कंपन्यांवर व कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले आहेत. केवळ माझे नातेवाईक आहेत म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र इतक्या खालच्या थराचे राजकारण केले जाईल असे वाटले नव्हते" असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला होता.

Ajit Pawar
असले फाल्तू प्रश्न मला विचारू नका!.. अजित पवार का वैतागले?

आयकर विभागाच्या छाप्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी अजित पवार यांनी जरंडेश्वर कारखाना आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या सगळ्या आरोपांना पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिली होती. राज्यात गेल्या १५ वर्षांमध्ये जवळपास ६५ साखर कारखान्यांची राज्य बँकेने लिलावाद्वारे विक्री केली तर ११ कारखाने हे भाडेतत्वावर चालवायला दिले. पण केवळ अजित पवार यांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या कारखान्यांवर बेछूट आरोप होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com