पुणे : विधवा महिलेच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत आठ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना शिरुर (shirur)परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आठ जणांनी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
माऊली पवार, रज्जाक पठाण, काळु वाकुंज, विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पु गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज, नवनाथ वाळुंज अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सर्व आरोपी हे एकाच गावातले असून महिलेच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन तिला जिवे मारायची धमकी देत आरोपी तिच्यावर बलात्कार करायचे. त्यामुळे प्रत्येकवेळी जिवाच्या भीतीमुळे महिला घाबरुन आरोपींसोबत जायची.
गेल्या सहा महिन्यांपासून आरोपींनी पीडित महिलेवर कधी घरामध्ये, उसाच्या शेतात, शाळेच्या पाठीमागे, नदीकिनारी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिला ही विधवा असून ती गावात एकटीच राहते. महिलेच्या एकटेपणाचा आणि भोळ्या स्वभावाचा या आरोपींनी गैरफायदा घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा त्रास असह्य झाल्यानंतर पीडित महिलेने शिरुर पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या मध्यमवयीन विधवा महिलेवर गेल्या 6 महिन्यात तिच्या गावातील या आठ जणांनी वेगवेगळ्या काळात लैंगिक अत्याचार केल्याची तक्रारी वरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करीत होते. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. कधी घरामध्ये, शेतातील उसात, शाळेच्या पाठीमागे, नदी किनारी अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आरोपींनी तिचा लैंगिक छळ केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.