Pune Lok Sabha Constituency : पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी पार पडला. या मेळाव्यात जिल्ह्यातील महायुतीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचले.
पुणे (Pune) लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी करोनाच्या काळात महापौर असताना अनेक कामे केली. त्यांच्या कामाची दखल घेत लोकसभेच्या निवडणुकीत पुणेकर त्यांना दिल्लीला पाठवतील. करोनाच्या काळात रस्त्यावर उतरून मोहोळ यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. आपण लोकं लोकांना मदत करण्याचे काम करत होतो तर काही लोकं त्याचवेळी भ्रष्टाचार करून स्वत:चे खिसे भरत होते.खिचडी मध्ये भ्रष्टाचार,ऑक्सिजन प्लँट मध्ये भ्रष्टाचार,बॉडी बॅग मध्ये भ्रष्टाचार करत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
फिल्डवर उतरून आपण सर्वसान्यांसाठी काम करत होतो, तर काही लोक मात्र घरात बसून फेसबुक लाईव्ह करायचे, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली. घरी बसून फेसबुक लाईव्ह करणारेच मोदींवर टीका करतात. आता मोदींची वक्रदृष्टी जर यांच्यावर पडली तर फेसबुकवर बोलणाऱ्याचं तोंडाला फेस येईल,अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना सुनावले. आपण काय बोलताय हे भान ठेवलं पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.
महायुतीचे उमेदवार मोहोळ यांना कुटूंबातून पैलवान असल्याचा वारसा आहे. पण ते वाटत नाहीत पैलवान आहेत. त्यांना कुठला डाव कधी टाकायचा, हे सर्व माहिती आहे, असे मुख्यमंत्री (CM) शिंदे म्हणाले. मोहोळ यांनी कार्यकर्ते म्हणून काम केले असल्याने या निवडणुकीत ते महायुतीच्या माध्यमातून दिल्लीत नक्की जाणार. आपले कार्यकर्ते चार्ज असल्याने मोहोळ यांच्यासह पुणे जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील. इथे आता भाऊ, तात्या कुणी नाही, तर मुरलीअण्णाच निवडून येणार, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
(Edited by - Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.