Chinchwad By- Elelction : दरवेळी मी साहेबांना मतदान करायचे आज स्वत: ला केलं... अश्विनी जगतापांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.
Chinchwad By- Elelction
Chinchwad By- ElelctionSarkarnama
Published on
Updated on

Chinchwad By-ElelCtion कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्या पासून मतदानाला सुरुवात झाली. चिंचवड मतदारसंघाचा आघाडीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होत आहे. कसबा पोटनिवडणुकीत एकूण १६ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत एकूण २८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मतदानाला सुरुवात झाल्यानंतर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या कुटूंबियांनी मतदानाचा हक्क बजावला. दरवेळी मी साहेबांना मतदान करायचे आज स्वत: ला मतदान केलं, अशी प्रतिक्रीयाही त्यांनी यावेळी दिली. त्याचवेळी चिंचवडमधील जनता लक्ष्मण जगताप यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रेम करत असल्याने या मतदारसंघात माझा निश्चितच विजय होईल, असा विश्वास अश्विनी जगताप आणि लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी व्यक्त केला. दरम्यान, या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होत आहे. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत एकूण ३.५२% टक्के मतदान झाले आहे.

Chinchwad By- Elelction
Congress अधिवेशनात राहुल गांधींच्या प्रस्तावाला केराची टोपली ; 'एक व्यक्ती-एक पद..'

तर दुसरीकडे, कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी मतदान करण्यापूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदीरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. रासनेंनीही यावेळी त्यांनी या निवडणुकीत विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीही मतदानाला सुरुवात झाल्यानंतर लगेच मतदान केले. धंगेकरही मतदानापूर्वी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन सकाळी पहिल्या टप्प्यातच मतदान केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com