Sunetra Pawar: शरद पवारांच्या युवा फॉर्म्युल्यानंतर सुनेत्रा पवारांनीचेही 'युवा' कार्ड; चाकणकरांच्या रिप्लेसमेंटसह दोन मोठे फेरबदल

Sunetra Pawar: दिल्लीतील जंतर-मंतरवरील युवक आंदोलनानंतर देशभरातील राजकीय पक्षांनी तरुण मतदार आणि युवा नेतृत्वावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.
NCP Setback; Sunetra Pawar
NCP Setback; Sunetra Pawarsarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar: दिल्लीतील जंतर-मंतरवरील युवक आंदोलनानंतर देशभरातील राजकीय पक्षांनी तरुण मतदार आणि युवा नेतृत्वावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटताना दिसत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून युवक आणि विद्यार्थी संघटनांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती राबवली जात आहे.

NCP Setback; Sunetra Pawar
Abhijit Dipke: ईडी, सीबीआय पाठवत असाल तर मोदींची डिग्रीही पाठवा! अभिजीत दीपकेंचे खुले आव्हान

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने युवक, विद्यार्थी आणि महिला संघटनांमध्ये महत्त्वाचे फेरबदल जाहीर केले आहेत. रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मान्यता दिली आहे. पुण्यातील देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांच्या हस्ते तिघांनाही नियुक्तीपत्र देण्यात आले.

शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवार गटाचाही युवा फोकस

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानेही युवक आणि युवती संघटनांमध्ये मोठी फेररचना केली होती. पक्षाने शहरी आणि ग्रामीण युवक संघटनांची स्वतंत्र रचना करत विशाल वाकडकर यांच्याकडे युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. तसेच मनाली भिलारे यांची शहर युवती प्रदेशाध्यक्ष, तर अमृता कालदाते यांची ग्रामीण युवती प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या या संघटनात्मक बदलांनंतर आता सुनेत्रा पवार यांनीही युवक आणि विद्यार्थी संघटनांमध्ये नवे नेतृत्व पुढे आणत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. निखिल ठाकरे आणि ॲड. चिन्मय गाढे यांच्यासारख्या युवा चेहऱ्यांना संधी देऊन पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकट करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे मानले जात आहे.

NCP Setback; Sunetra Pawar
Valmik Karad: वाल्मिक कराडला बीडच्या तुरुंगात मिळतेय VIP ट्रिटमेंट? मुख्यमंत्र्यांकडं दोन खासदारांची महत्वाची मागणी; संतोष देशमुख प्रकरणात नेमकं काय सुरुए?

युवा मतदारांवर दोन्ही राष्ट्रवादींचा भर

दिल्लीतील युवक आंदोलनानंतर देशातील विविध राजकीय पक्षांनी युवक आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद वाढविण्याची रणनीती स्वीकारली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी सलग युवक संघटनांमध्ये फेरबदल केल्याने आगामी काळात युवा मतदार आणि नव्या नेतृत्वासाठी दोन्ही गटांमध्ये स्पर्धा अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, युवक संघटनांतील हे बदल केवळ संघटनात्मक फेरबदल नसून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तरुण नेतृत्वाला पुढे आणण्याच्या व्यापक राजकीय रणनीतीचा भाग म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com