Ravindra Dhangekar News: मेट्रोच्या कामांमुळे गणेश मंडळे अडचणीत; रवींद्र धंगेकरांंची मेट्रोकडे 'ही' मागणी

Pune News: आमदार धंगेकर यांनी नुकतीच टिळक पुतळा ते मंडई या दरम्यान सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाची पाहणी केली.
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ravindra Dhangekar on Pune Metro: गणपती उत्सव आणि दहीदंडीच्या सणांपूर्वी शहरातील मेट्रोचे काम पूर्ण करावे, अशी मागणी काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केली आहे. एक ऑगस्टपर्यंत मेट्रोचे सर्व काम पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

पुणे (Pune News) शहरातील मानाचे पाच गणपती मंडळांचे प्रमुख आणि मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी यांच्यासोबत आमदार धंगेकर यांनी नुकतीच टिळक पुतळा ते मंडई या दरम्यान सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाची पाहणी केली. या दौऱ्यानंतर आयोजित बैठकीत त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली. तसेच, शहराच्या मध्यवर्ती भागातील छोटी-मोठी गणेश मंडळे, व्यापारी, नागरीकांसह इतरांना मेट्रोच्या कामामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

Ravindra Dhangekar
Shivsena News: शिवसेनेचे शहरप्रमुख आपल्याच पदाधिकाऱ्यांवर भडकले; नेमकं काय घडलं?

नागरीकांच्या अडचणी कमी होण्यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना करता येतील आणि कोणत्या उपाययोजना प्राधान्याने कराव्या लागतील, यावरही या सविस्तर चर्चा झाल्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं. या वेळी आमदार धंगेकर, जोशी, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ॲड. रुपाली ठोंबरे पाटील, बाळासाहेब मारणे, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. (Pune Metro)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.