Neelam Gorhe vs Sushma Andhare : विनायक राऊतांवरील आरोपानंतर सुषमा अंधारें-नीलम गोऱ्हेंना आमने सामने; 'संधीसाधू नेत्या...' म्हणत निशाणा

Girija Raut vs Vinayak Raut : गिरीजा राऊत यांच्या तक्रारीची दखल घेत नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून निष्पक्ष चौकशीची मागणी केली. तर, सुषमा अंधारे यांनी राजकीय स्टंट असल्याचा टोला गोऱ्हे यांना लगावला.
Neelam Gorhe Vs Sushma
Neelam Gorhe Vs Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Pune News : खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी कुटुंबाविरोधात केलेल्या कौटुंबिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण झालं आहे. शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात थेट उडी घेत पीडितेची पाठराखण केली आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या संपूर्ण प्रकरणावरून नीलम गोऱ्हे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका करत त्यांच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केले आहेत.

गिरीजा राऊत यांच्या तक्रारीची दखल घेत नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून निष्पक्ष चौकशीची मागणी केली, तसेच पीडितेला धीर दिला आहे. मात्र, गोऱ्हेंची ही तत्परता निव्वळ राजकीय स्टंट असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, गिरीजा राऊत प्रकरणात नीलम गोऱ्हे यांना अचानक संताप अनावर झाला आहे. कोणत्याही स्त्रीवर अन्याय झाला, तर तिला साथ दिलीच पाहिजे, यात दुमत असण्याचं कारण नाही. पण प्रश्न असा उरतो की, गिरीजा राऊत ज्या कालखंडातील छळाबाबत बोलत आहेत, त्या काळात नीलम गोऱ्हे तुम्ही स्वतः त्याच पक्षात कार्यरत होतात. मग तेव्हा तुम्ही झोपा काढत होतात का, असा सवाल अंधारे यांनी केला आहे.

Neelam Gorhe Vs Sushma
Vinayak Raut family controversy : विनायक राऊतांवरील गंभीर आरोपांवर सुषमा अंधारेंचा थेट बॉम्ब! म्हणाल्या, 'मला विषय...'; विरोधक चकित!

पुढे बोलताना अंधारे म्हणल्या, गोऱ्हे यांचा हा कळवळा म्हणजे निव्वळ 'मानभावीपणा' असून तो त्यांनी आता बंद करावा, नीलम गोऱ्हे यांना प्रत्यक्षात कोणत्याही महिलेच्या सुख-दुःखाशी काहीही देणं-घेणं नाही. त्या केवळ आणि केवळ स्वतःची राजकीय पोळी कशी भाजता येईल, याचा अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या कमालीच्या स्वार्थी आणि संधीसाधू नेत्या आहेत, अशी टीका अंधारेंनी केली.

एकीकडे नीलम गोऱ्हे कायदेशीर कारवाईची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे थेट मैदानात उतरल्या आहेत त्यामुळे शिवसेनेच्या या दोन महिला नेत्या आमने-सामने आले असल्याचे पाहायला मिळत आहे.

Neelam Gorhe Vs Sushma
Vinayak Raut : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राऊतांनी सुनेचा अतोनात छळ केल्याचा आरोप! बळजबरीने केस कापले, गोमुत्र प्यायला लावलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com