Gaon Chalo Abhiyan : हर्षवर्धन पाटलांचा कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम; घोंगडी, पाटा-वरवंट्याची केली खरेदी...

Harshvardhan Patil News : मला बोरी गावातून नेहमी कमी मतदान होते. मात्र, मी त्याचा कधीही आकस धरला नाही.
 Harshvardhan Patil
Harshvardhan Patil Sarkarnama
Published on
Updated on

Indapur News : घोंगडी बनविणाऱ्या करागिराने दिलेली घोंगडीची भेट नाकारून त्याच्या कलेचा सन्मान करण्यासाठी माजी सहकार मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी त्याच्याकडून ती विकत घेतली. घोंगडी बनविणाऱ्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्या कष्टाची मोबदला त्याला मिळावा, यासाठी पाटील यांनी खरेदी केली. (Harshvardhan Patil's stay at activist house under Gaon Chalo Abhiyan)

दरम्यान, भाजपच्या गाव चलो अभियानांतर्गत पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील बोरी गावातील वैभव देवडे यांच्या घरी शनिवारी (ता. १० फेब्रुवारी) रात्रीचा मुक्काम केला. (Gaon Chalo Abhiyan)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Harshvardhan Patil
Mahadev Jankar : इंजिनिअरिंगचे गोल्ड मेडलिस्ट ते राज्याचे कॅबिनेट मंत्री - महादेव जानकर

इंदापूर तालुक्यातील बोरी गावातून भारतीय जनता पक्षाच्या तालुकास्तरी ‘गाव चलो अभियाना’ची सुरूवात करण्यात आली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गावातील विविध समूह घटकातील ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली. या वेळी त्यांनी मोदी सरकारने जाहीर केलेल्या विश्वकर्मा योजनेचा आवर्जून प्रचार केला. शेतकऱ्यांनाही काही योजनांची माहिती दिली.

हर्षवर्धन पाटील यांनी बोरी गावात घोंगडी बनविणारे पोपट धालपे यांच्या घरी भेट दिली. त्यांच्याकडून घोंगडी बनविण्याच्या व्यवसायाची माहिती जाणून घेतली. घोंगडी बनविण्याची माहिती दिल्यानंतर धालपे यांनी माजी मंत्री पाटील यांना एक घोंगडी भेट दिली. मात्र, पाटील यांनी हे भेट नाकारून तीच घोंगडी रोख रक्कम देऊन खरेदी केली. धालपे यांच्या कलेची कदर व्हावी आणि त्यांच्या कष्टाचा त्यांना मोबदला मिळावा, या हेतूने पाटील यांनी धालपे यांच्याकडून घोंगडी खरेदी केली.

 Harshvardhan Patil
Solapur Loksabha : सोलापुरात काँग्रेसचे बेरजेचे राजकारण; इच्छुक वाढवणार भाजपची डोकेदुखी

पाटील यांनी गावातील पंडित धोत्रे यांच्या घरी भेट दिली. ते पाटे, वरवंटा तयार करणाऱ्याचे काम करतात. त्याची पाहणी करून धोत्रे यांच्याकडूनही पाटील यांनी दगडी खलबत्ते आणि पाटा, वरवंटा आदीची खरेदी केली. हे कारागिरांची कला जोपसण्यासाठी त्यांच्याकडून वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहनही पाटील यांनी केले.

गाव चलो अभियान हे विकासाला चालना देणारे अभियान आहे. ते फक्त भाजपा पुरते मर्यादीत नाही. मला बोरी गावातून नेहमी कमी मतदान होते. मात्र, मी त्याचा कधीही आकस धरला नाही. पण, सध्या आपुलकीचे वातावरण बोरी गावात तयार होत असून येथील जनता आमच्यावर प्रेम करू लागली आहे. सामाजिक कामांच्या माध्यमातून बोरीकरांच्या प्रेमातून उतराई होण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

 Harshvardhan Patil
Baramati Politics : अजितदादांचा बारामतीतच काकांना धक्का; दूध संघाच्या माजी अध्यक्षांची 22 दिवसांतच घरवापसी

‘महायुतीच्या उमेदवाराला विजयी करणार’

इंदापूर तालुक्यातील जनता हुशार आहे, त्यांना सत्य काय आहे, ते आता कळाले आहे. ‘सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराभूत नही हो सकता,’ असे विधानही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. येत्या दोन ते तीन दिवसांत लोकसभेच्या जागा वाटपांचा निर्णय राष्ट्रीय स्तरावर होईल. त्यानंतर अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा होईल. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकष्टा करू, असेही पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Vijay Dudhale

 Harshvardhan Patil
Supriya Sule Aggressive : पुण्यातील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे आक्रमक; ‘हल्ले करा; गोळ्या घाल्या; पण आम्ही झुकणार नाही’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com