Sharad Mohol Case Update : गुंड मोहोळ खून प्रकरणातील आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या 13 वर...

The information that money was paid to the main accused came out during the investigation : मुख्य आरोपीला पैसे दिल्याची माहिती चौकशीत आली समोर.
Sharad Mohol Case
Sharad Mohol CaseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत असून आरोपींची संख्यादेखील वाढत चालली आहे. या प्रकरणात पोलिसांनी नवीन तीन आरोपींना अटक केली. यामुळे आतापर्यंत अटक आरोपींची संख्या आता 13 वर गेली आहे. या आरोपींनी मुख्य आरोपीला पैसे दिल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

कोथरुड भागातील सुतारदरा परिसरात गेल्या आठवड्यात 5 जानेवारीला कुख्यात गुंड मोहोळ याचा गोळ्या घालून खून करण्यात आला. भरदुपारी करण्यात आलेल्या गोळीबारामुळे कोथरुड परिसरासह संपूर्ण पुण्यात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पावले उचलत आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली.

Sharad Mohol Case
Mahayuti Rally in Ratnagiri : रत्नागिरीतील महायुतीचा मेळावा अजित पवारांच्या अडचणीचा?

वेगवेगळ्या भागात पथके पाठवून पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच या भागातील नागरिकांची चर्चा करून आवश्यक ते पुरावे गोळा करीत पोलिसांनी या खुनातील आरोपींना अवघ्या काही तासांत जेरबंद केले. खुनाची घटना झाल्यानंतर पहिल्या काही तासांतच पोलिसांनी मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर यासह आठ आरोपींना अटक केली.

पोळेकर याने आपला मामा याच्याशी गुंड मोहोळ याचा वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्यासाठी मोहोळ याच्यावर हल्ला करीत खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सुरुवातीला अटक केलेल्या आरोपींमध्ये शिवाजीनगर कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या दोन वकिलांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून शुक्रवारी (दि. 12 जानेवारी) रात्री पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली. आदित्य गोळे, नितीन खैरे या दोघांसह अजून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी गोळे, खैरे यांनी मुख्य आरोपींना पैसे पुरविले असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

मुख्य आरोपी पोळेकर गोळीबाराचा सराव करीत होता. त्यावेळी हे तिन्ही आरोपी तेथे हजर असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले वकील आरोपी यांच्याबरोबर मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याची काही दिवसांपूर्वी 'मीटिंग'देखील झाली होती. त्यामुळे या हत्येचा कट अनेक महिन्यांपासून शिजत असल्याचे तपासात समोर आले आहे. याचा सखोल तपासदेखील आता पोलिसांनी सुरू केला आहे.

(Edited by Amol Sutar)

R...

Sharad Mohol Case
Chhagan Bhujbal News : जिल्हा बँकेला हवेत भुजबळांकडील 51 कोटी; काय आहे प्रकरण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com