Hinjewadi Metro: हिंजवडीतल्या वाहतुक कोंडीतून होणार सुटका! लवकरच धावणार मेट्रो, फडणवीसांकडून थेट दिल्लीत मोदींना निमंत्रण

Hinjewadi Metro will be started soon : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना थेट उद्घाटनासाठी निमंत्रण दिलं.
Hinjewadi Metro_ Narendra Modi_Devendra Fadnavis
Hinjewadi Metro_ Narendra Modi_Devendra Fadnavis
Published on
Updated on

Hinjewadi Metro will be started soon : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू होण्याची पुणेकरांची प्रतीक्षा आता संपणार आहे, कारण याची तारीख आता फिक्स झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना थेट उद्घाटनासाठी निमंत्रण दिलं. त्यामुळं पुढच्या महिन्यात अर्थात सप्टेंबरमध्ये ही मेट्रो सुरु होईल असं सांगितलं जात आहे.

Hinjewadi Metro_ Narendra Modi_Devendra Fadnavis
Rahul Gandhi : राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा : कर्नाटकातील भाजप नेत्याचा डाव उधळला, हायकोर्टाची सुनावणी थांबवली

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील माण ते बालेवाडी या पहिल्या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी २३ जुलै रोजी प्रवासी वाहतुकीची मंजुरी दिली. या मंजुरीला जवळपास तीन आठवडे उलटून गेले असतानाही प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे मेट्रो सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून नेमका कोणता मुहूर्त साधला जात आहे? असा सवाल उपस्थित होत होता.

या मेट्रोच्या उद्घाटनासाठी यापूर्वीही तीन ते चार संभाव्य तारखा समोर आल्या होत्या. मात्र, त्या तारखा उलटून गेल्यानंतरही सेवा सुरू झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मेट्रोला विलंब होत असल्याची चर्चा पुण्यात सुरू होती.

Hinjewadi Metro_ Narendra Modi_Devendra Fadnavis
BJP Leader : भाजपमध्ये मोठा भूकंप! राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांचा राजीनामा; पत्रातील 2 धक्कादायक कारणांनी राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाला पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी वेळ मागणारे पत्र देण्यात आल्याची माहिती आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे.

या महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे फडणवीस-मोदी भेटीत मेट्रोच्या उद्घाटनाची तारीख निश्चित झाली असल्याची चर्चा आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा माण ते बालेवाडी, तर दुसरा टप्पा बाणेर हायस्ट्रीट ते शिवाजीनगर असा आहे. संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर हिंजवडी आयटी परिसर, बाणेर, बालेवाडी आणि शिवाजीनगरला जोडणारी ही महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठरणार आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील मेट्रोच्या यापूर्वीच्या दोन्ही टप्प्यांचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनासाठीही मोदींनाच निमंत्रित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

फडणवीस यांनी दिल्लीत मोदींची भेट घेतल्यानंतर आता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अधिकृत उद्घाटनाची तारीख जाहीर झाल्यानंतरच पुणेकरांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com