Rahul Gandhi : राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा : कर्नाटकातील भाजप नेत्याचा डाव उधळला, हायकोर्टाची सुनावणी थांबवली

Rahul Gandhi news regarding excess property than income : सुप्रीम कोर्टानं याच प्रकरणावर सध्या हायकोर्टात सुरु असलेल्या सुनावणीला स्थगिती दिली. तसंच तक्रारदार, सीबीआय, ईडी यांच्यासह संबंधित संबंधित पक्षांना नोटीस पाठवली आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi news : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्यावरील उत्पन्नापेक्षा संपत्ती अधिक असल्याच्या आरोपांशी संबंधीत सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली, यावेळी कोर्टानं याच प्रकरणावर सध्या हायकोर्टात सुरु असलेल्या सुनावणीला स्थगिती दिली. तसंच तक्रारदार, सीबीआय, ईडी यांच्यासह संबंधित संबंधित पक्षांना नोटीस पाठवली आहे.

Rahul Gandhi
Pune-Bangalore Highway : महाराष्ट्रातील मोठ्या प्रोजेक्टला अचानक ब्रेक? PM मोदींची मान्यता लटकली; स्थगितीची चर्चा, कारण गुलदस्त्यात

राहुल गांधींनी दिलं होतं आव्हान

राहुल गांधींच्या घोषित उत्पन्नापेक्षा त्यांची संपत्ती अधिक आहे. त्यामुळं या प्रकरणी चौकशी करणं गरजेचं आहे, असं म्हणत कर्नाटकचे भाजप कार्यकर्ते एस. विग्नेश शिशीर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या आरोपांच्या चौकशीसाठी कोर्टाने सीबीआय आणि ईडीला कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई करण्यासाठी सूट दिली होती. राहुल गांधी यांनी या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.

सुप्रीम कोर्टांन या दोन्ही तपास यंत्रणांना आणि इतर अधिकाऱ्यांना सध्या या प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाच्या समोर कुठलाही अहवाल सादर करु नये, असे आदेश दिले आहेत. तसंच जोपर्यंत सुप्रीम कोर्ट या प्रकरणी पुढे सुनावणी करणार नाही, तोपर्यंत यावरील सुनावणी स्थगित ठेवावी, असेही निर्देश दिले आहेत. पण ही अंतरिम स्थगिती असून यावरचा अंतिम निर्णय हा पुढील सुनावणीनंतर होईल.

Rahul Gandhi
Barshi Politic's : तीन अपत्यांची माहिती का दिली? : बार्शीत नगरसेवकाच्या भावांकडून जीवे मारण्याची धमकी

...तरच पुढील सुनावणीची तारीख निश्चित होणार

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सध्या या प्रकरणाशी संबंधित चौकशीचा अहवाल अलहाबाद हायकोर्टात दाखल करता येणार नाही. त्यामुळं २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. यानंतर सुप्रीम कोर्ट आता राहुल गांधी यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी करणार आहे. त्यानंतर संबंधित पक्षांकडून उत्तर आल्यानंतर या प्रकरणाची पुढील दिशा निश्चित होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com