Uday Samant : उद्योगमंत्र्यांना राजकारण्यांकडून भलतीच अपेक्षा; म्हणे, ‘माझ्यासारख्यांची चांगली सोय होईल’, पण सामंतांच्या मार्गातील तो अडथळा कोण?

Alandi Political News : नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी 'मी आमदार, खासदार झालो आहे. मला यापेक्षा पुढे जायचे नाही. खासदार हे माझे राजकारणातले शेवटचे पद आहे. यापुढे मला काहीच नको, असे सांगितले.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Alandi, 03 June : आळंदीतील धार्मिक कार्यक्रमात नाशिकचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची राजकीय जुगलबंदी रंगली. ‘मी आमदार, खासदार झालो. यापेक्षा पुढे मला जायचे नाही, यापेक्षा राजकारणातले माझे शेवटचे पद आहे, असे सांगून खासदार वाजेंनी राजकीय निवृत्तीबाबत भाष्य केले. तोच धागा पकडून सामंत यांनी ‘वाजेंसारखी राजकीय निवृत्तीची भूमिका सर्व राजकारण्यांनी घेतली, तर माझ्यारख्यांची चांगली सोय होईल’ असे टिपण्णी केली. मात्र सामंतांचा राजकीय रस्ता नेमका कोणत्या नेत्याने अडवला?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

माऊलींचे ७५० वे जन्मोत्सव वर्षे आणि प्रमोद महाराज जगताप यांच्या षष्ट्यपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या समाप्तीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant), खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते. या वेळी गौरव ग्रंथाचेही प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमात बोलताना नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांनी मी आमदार, खासदार झालो आहे. मला यापेक्षा पुढे जायचे नाही. खासदार हे माझे राजकारणातले शेवटचे पद आहे. यापुढे मला काहीच नको. वारकरी म्हणूनच मी आता वाटचाल स्वीकारली आहे, असे सांगून वाजे यांनी आपण राजकीय निवृत्ती घेणार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.

तोच धागा पकडून उद्योगमंत्री सामंत यांनी आपल्या मनातील भावाना बोलून दाखवल्या. ते म्हणाले, कोट्यवधी लोकांची भावना व्यक्त होत असते की, राजकारणात वावरताना ६१ व्या वर्षी स्थिर झाले पाहिजे. मात्र, खासदार राजाभाऊ वाजे यांनी राजकीय निवृत्तीची भूमिका सर्वच राजकारण्यांनी घेतली पाहिजे. सध्याच्या राजकारणात वयाच्या ९५ वर्षांनंतरही तिकिट मागितले जाते. माझं वय आता ४९ आहे. मी आतापर्यंत पाचवेळा निवडून आलोय. राजभाऊ वाजेंसारखा निकष सर्व राजकारण्यांना लागू केला तर माझ्यासारख्या राजकारण्याची चांगली सोय होईल.

Uday Samant
Anjali Damania : अंजली दमानियांचा पंकजा मुंडेंवर तिखट प्रहार; म्हणाल्या, ‘ज्या आपल्या भावाला बदलू...’

दरम्यान, उदय सामंतांनी केलेल्या विधानाची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली हेाती. सामंतांना कोकणात नेमकी कोणाची अडचण आहे. असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सामंत पाच वेळा निवडून आले आहेत. ते उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना आता कोणते पद खुणावत आहे, अशी चर्चा रंगली आहे.

पुण्यातील नेतेमंडळी भाग्यवान

रत्नागिरीतून अनेक तासांचा प्रवास करून मी आळंदीत येतो, असे पुण्यात राहणाऱ्यांना वाटत असेल. पण पुण्यातील नेतेमंडळींना मी भाग्यवान समजतो. कारण त्यांना तासभरातच आळंदीत येता येते, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

Uday Samant
Mahadev Jankar : 'आप मुंडेसाहब के बेटे है क्या?' त्या वेळी माझ्या डोळ्यातून पाणी आले : जानकरांनी सांगितला ग्वाल्हेरमधील किस्सा!

सामंतांनी नवीन मतदरासंघ शोधला की काय?, असे काहींना वाटेल

आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रात मागील सहा महिन्यांत मला तीन वेळा येण्याचे भाग्य लाभले आहे. आळंदी हे आनंदाचे क्षेत्र आहे. राजकारण्यांना वाटेल की, मी आळंदीला सारखा का जातोय. उदय सामंतांनी नवीन मतदरासंघ शोधला की काय. कोकण सोडून आळंदी मतदार संघ निवडणुकीसाठी शोधला की काय, असे राजकीय नेत्यांना वाटू कशते. पण, मी मतदारसंघ शोधला नाही, तर आळंदीची वाट धरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com