Why I Killed Gandhi या पुस्तकावर बंदी घातल्यास ब्राह्मण महासंघाने दिला 'हा' इशारा...

गांधीजी (Mahatma Gandhi) यांच्या हत्येमागील गोडसे यांची भूमिका काय होती याचा अभ्यास करायला काय हरकत आहे?, असा सवाल ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे (Anand Dave) यांनी केला आहे.
Why i kill gandhi
Why i kill gandhiSarkarnama
Published on
Updated on

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महात्मा गांधी यांच्या हत्येवर आधारीत 'Why I Killed Gandhi' या चित्रपटात नथूराम गोडसे (Nathuram Godse) यांची भूमिका साकारलेले राष्ट्रवादीचे (NCP) खासदार डॅा. अमोल कोल्हेंवर (Amol Kolhe) टीका केली जात आहे. तर, काही जणांनी त्यांचे समर्थन करत अभिव्यक्ती स्वातत्र्यांचा भाग म्हणून त्यांच्यावर केली जाणारी टीका ही चुकीची असल्याचे सांगत त्यांची पाठराखण केली जात आहे. दरम्यान, 'व्हाय आय किल्ड गांधी' या पुस्तकावर बंदीची मागणी केली जात आहे. यावर या पुस्तकावर बंदी घालू नये. बंदी घातल्यास त्या पुस्तकाचे मोफत वाटप करू, असा इशारा ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी रविवारी (ता. 23 जानेवारी) दिला आहे.

Why i kill gandhi
पुणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या समायोजन बदल्यांना लागणार ब्रेक

दवे म्हणाले, या पुस्तकाची पीडीएफ प्रत महासंघाने तयार केली असून ती व्हायरलही करण्यात येत आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन महासंघ करीत नाही व कधीही करणार नाही. मात्र, इतिहासापासून प्रतारणा करून नवा इतिहास कोणी तयार करण्याचा प्रयत्न करीत असेल तर, त्याला आमचा विरोध असेल, असेही त्यांंनी स्पष्ट केले आहे.

धर्मवीर संभाजी महाराज यांची दूरचित्रवाणी मालिकेत भूमिका साकारणारे कलाकार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूर लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी 'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटात नथूराम यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. परंतु, खासदार कोल्हे २०१७ मध्ये त्या चित्रपटात केलेली भूमिका सध्या चर्चेत आहे. केवळ कलाकार म्हणून त्या भूमिकेकडे पाहवे, त्या विचारधारेचा मी समर्थक नाही, असेही डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेते नाना पाटेकर यांनीही कलाकार म्हणून डॉ. कोल्हे यांनी साकारलेल्या भूमिकेला समर्थन दिले आहे.

Why i kill gandhi
"अजितदादा म्हणतात लसीची सक्ती; राजेश टोपेंनी सांगितले घेण्यास भाग पाडू"

या पार्श्वभूमीवर 'व्हाय आय किल्ड गांधी' हे पुस्तक पुन्हा चर्चेत आले आहे. काही संघटनांनी या पुस्तकावर पुन्हा बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्याला ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शविला आहे. संस्थेचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले, "खरे महात्मा गांधीजी आणि नथूराम गोडसे लोकांसमोर येणे गरजेचे आहे. हत्या कोणतीही चूकच आणि निषेधार्हच आहे. पण इंदिरा गांधी यांच्या हत्येमागे सुवर्ण मंदिर प्रकरण, राजीव गांधी यांच्या हत्येमागे शांती सेनाचा निर्णय, अशी कारणे सांगितली जातात. गांधीजी यांच्या हत्येमागील गोडसे यांची भूमिका काय होती याचा अभ्यास करायला काय हरकत आहे?"

आम्ही कोठेही नथूराम गोडसे यांचे समर्थन करीत नाहीत. पण, त्यांचे विचार समाजाने समजून घ्यावे इतकेच आमचे म्हणणे आहे. पुस्तकावर बंदी घालून विचार संपत नाहीत. याची जाणीव ठेवून या बाबतचा निर्णय विवेकाने घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com