Pune MLC Election: पुणे शिक्षक आमदारकीसाठी इच्छुक वाढले; पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून सुमारे ५३ हजार मतदार

Pune Politics: पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजत आहेत. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेला हा मतदारसंघ ५२ हजार ८०० हून अधिक शिक्षक मतदारांचे प्रतिनिधित्व करतो.
Teacher Constituency Election
Teacher Constituency Electionsarkarnama
Published on
Updated on

दिलीप क्षीरसागर

Pune News: पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजत आहेत. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेला हा मतदारसंघ ५२ हजार ८०० हून अधिक शिक्षक मतदारांचे प्रतिनिधित्व करतो. यावेळी बहुपक्षीय आणि बहुरंगी लढतीची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. इच्छुकांनी प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर देत संपर्क ठेवला जात आहे.

टीचर्स डेमोक्रॅटीक फ्रंटकडून (टीडीएफ) कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली आहे. दुसरीकडे, महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. भाजपच्या गोटातून शिक्षण क्षेत्रातील दांडगा अनुभव असणारे नंदकुमार सागर यांचे नाव चर्चेत आहे.

तसेच प्रदीर्घ शैक्षणिक कामाचा अनुभव आणि मजबूत संघटन असलेले माजी आमदार भगवानराव साळुंखे पुन्हा आग्रही आहेत. शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी आमदार राजेश क्षीरसागर व आमदार सुहास बाबर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्न सुरू केले आहेत. इथे महायुतीसमोर जागा मिळवण्यासाठी पेच आहे.

महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अद्याप पत्ते उघडलेले नाहीत. काँग्रेसकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर पुन्हा इच्छुक आहेत. विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान मिळवून देण्यासाठी लढा देणारे खंडेराव जगदाळे हेदेखील उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.

Teacher Constituency Election
SSC HSC Exam: मोठी बातमी: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी- बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

याशिवाय, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. सावंत यांना महाविकास आघाडीचे पाठबळ मिळणार की ते पुन्हा अपक्ष लढणार, यावर निवडणुकीची गणिते अवलंबून असतील.

शैक्षणिक क्षेत्रात दबदबा असलेले डॉ. पी. बी. रोंगे, प्रा. सचिन सानप यांनीही तयारी सुरू केली आहे. मूळ पक्ष व संघटनांचा अधिकृत पाठिंबा कोणाला मिळतो, यावरच अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

Teacher Constituency Election
Chhatrapati Sambhajinagar News: महापौर, सत्ताधारी जुमानत नाही, निधी वाटपात भेदभाव...; विरोधी पक्षनेत्याची मुख्यमंत्र्यांकडेच मोठी मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com