Junnar Girl Murder Case : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या, 25 वर्षीय आरोपीला अटक

Minor girl assaulted and murdered in Junnar : जुन्नर तालुक्यामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
25 year old accused arrested in Junnar murder case
25-year-old arrested in Junnar girl murder caseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात उघडकीस आली आहे. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पीडित कुटुंबाकडून पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी मुलीच्या कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या संशयित 25 वर्षीय तरुणाला अटक करून तपास केला असता अत्याचार करून मुलीची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, चौथीत शिकणारी १० वर्षीय चिमुकली आजारी असल्याने शाळेत गेली नव्हती. तिचे पालक घरी नव्हते. घरी आल्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याने त्यांनी तिचा शोध घेतला.मात्र, ती सापडली नाही. अखेर पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली.

पोलिसांसह गावातील लोक तिचा शोध घेत असताना संशयित आरोपी योगेश पवार हा देखील मुलीचा शोध घेण्यासाठी मदत करत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. आळेफाटा पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला पोलिस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने दाखवलेल्या ‘लेंडे स्थळ’ परिसरातील एका ओढ्याकाठी झाडाजवळ मुलीचा मृतदेह निष्प्राण अवस्थेत आढळून आला.

25 year old accused arrested in Junnar murder case
Love Dispute Assault: 4 वर्षांच्या प्रेमानंतर वाद; 'लग्न कर, नाहीतर आयशर टेम्पो दे', प्रियसीच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

पुण ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यापूर्वी फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.

आरोपीला फाशी देण्याची मागणी

हा घटनेनंतर जुन्नर तालुक्यात संतापाचे वातावरण असून आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे. हा खटला फास्टट्रॅक कोर्टासमोर चालवून आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडित कुटुंबीयाकडून आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

25 year old accused arrested in Junnar murder case
Shrirampur Rape Case : बंदुकीचा धाक, धमक्या अन् 40 दिवस डांबून ठेवत अत्याचार; हिंदुत्ववादी नेत्यासह तिघांवर गुन्हा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com