अभिनेत्री केतकी चितळेचे डोके फिरले? नेटकऱ्यांचा सवाल

केतकी चितळे हिने शरद पवारांविषयी (Sharad Pawar) अतिशय हिन दर्जाची पोस्ट शेअर केली आहे.
Ketaki Chitale
Ketaki Chitalesarkarnama
Published on
Updated on

पुणे : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट करत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी गरळ ओकली आहे. केतकी अनेकदा अशा पोस्ट करत असते. या वेळी मात्र तिने हद्द ओलांडल्याची टीका होत आहे.

एक वकिलाची शरद पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट तिने शेअर केल्याचे दाखवले आहे. पण त्या पोस्टमध्ये अतिशय आपत्तीजनक अशा टिप्पण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिच्यावर पोलिस कारवाई होण्याची शक्यता होत आहे.

याबाबत डाॅ. बालाजी जाधव यांनी टोकदार टीका केली आहे. चितळे नावाची कुणी एक बया आहे. तिने तिच्या वॉलवर advocate नितीन भावेची एक टुकार, बौद्धिक दिवाळखोरी आणि मानसिक विकृती दाखवणारी चंदू गोखले छाप कविता शेअर केलेली आहे. या संपूर्ण ओळींमध्ये पवार द्वेष कसा आणि किती ठासून भरलेला आहे हे कुणाही सज्जन माणसाच्या चटकन लक्षात येईल. कविता लिहिणाऱ्याने आणि ती शेअर करणाऱ्या नालायक व्यक्तीने वेडाचे झटके आल्याबरहुकूम हा समग्र प्रकार केलेला दिसत आहे. पैकी एका व्यक्तीला बरेच झटके येत असल्याचे त्यांच्याच पोस्ट मधून समजले आहे. पण यावेळचा हा झटका अमळ जोरातच बसलाय म्हणायचा.

Ketaki Chitale
Sarkarnama Open Mic Challenge: मोदींची तुलना फक्त नेहरूंशीच: आ. परिणय फुके

भावे नावाच्या चंदू गोखले छाप कवीने आपल्या टुकार काव्याची सुरुवातच " तुका म्हणे " अशा शब्दाने केलेली आहे. या भावेने खरेतर " नितीन भावे म्हणे " किंवा " रामदास म्हणे " अशा नाममुद्रेने सुरुवात करायला हवी होती. पण त्याने ती तशी न करता " तुका म्हणे " यांना नाममुद्रेने केली आहे. म्हणजे पवारांची बदनामी करणारे शब्द जणू तुकाराम महाराजच लिहित आहेत असे वाचणाऱ्यास वाटावे. ही जगद्गुरू तुकाराम महाराजांची घोर विटंबना आहे. तुकोबांना आपल्या जीवाचे जीवन मानणाऱ्या करोडो वारकऱ्यांचा हा घोर अपमान आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com