Khadakwasla Assembly: अजितदादा अन् फडणवीसांचे भिडू भिडणार; पुण्यात दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत?

Datta Dhankawde Claims Official NCP Candidacy: दत्ता धनकवडे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला असल्याने खडकवासला विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांमध्ये महायुतीतील मित्र पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत कोणाची शक्यता निर्माण झाली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपने चौथांदा विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना निवडणूक रिंगणात उतरवला आहे.

त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते माजी महापौर दत्ता धनकवडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दत्ता धनकवडे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला असल्याने खडकवासला विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने खडकवासला विधानसभा मतदारसंघात असल्यास उमेदवार देण्याची तयारी केल्याने भाजप देखील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील असं सांगितलं होतं त्यामुळे या शक्यतांना बळ मिळाल्या असल्याचे बोलले जात आहे.

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ हे भाजपाच्या वाट्याला तर दोन विधानसभा मतदारसंघ अजित दादांच्या राष्ट्रवादीला मिळाले आहेत. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप सुरुवातीपासून आग्रही होतं. मात्र

या ठिकाणी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या जगदीश मुळीक यांनी या ठिकाणी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू ठेवली असल्याचं बोललं जातंय. पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिल्यास आपण निवडणूक लढणार असल्याचं जगदीश मुळीक यांनी सांगितले आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar: अजितदादांनी डाव टाकला ! थेट उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखालाच दिली उमेदवारी

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने खडकवासल्यातून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता बळावली आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात पक्षांतर्गत विरोध डावलून भाजपने पुन्हा एकदा भीमराव तापकीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. अशातच आता माजी महापौर आणि अजित पवार गटात असलेले दत्ता धनकवडे यांनी आपण खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले आहे.

आपण राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आल्याचं बोललं जात आहे. आता हे उमेदवारी अर्ज फक्त दबाव निर्माण करण्यासाठी दाखल करण्यात आले आहेत की खरच मैत्रीपूर्ण लढत होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com