Ajit Pawar: अजितदादांनी डाव टाकला ! थेट उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखालाच दिली उमेदवारी

Ajit Pawar Political Strategy: भाजपमधून माजी नगरसेवक किरण दगडे पाटील तर शिंदेंच्या शिवसेनेकडून कुलदीप कोंडे आणि बाळासाहेब चांदेरे इच्छुक होते. अजित पवार यांच्याकडून रणजीत शिवतारे देखील निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येत होतं.
Ajit Pawar Slams Uddhav Thackeray
Ajit Pawar Slams Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी काल (सोमवार) उशिरापर्यंत बहुतांश सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत.

महायुतीतील तिन्ही पक्षांच्या वादात अडकलेल्या भोर,राजगड, मुळशी विधानसभा मतदारसंघात देखील रात्री उशिरा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. हा मतदारसंघ अजित पवारांच्या वाट्याला गेला आहे.अजितदादांनी या ठिकाणी एक सप्राईज उमेदवार दिला आहे. थेट ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखालाच तिकीट जाहीर केले आहे.

भोर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून चौथ्यांदा संग्राम थोपटे निवडणूक रिंगणात आहे. भोर विधानसभा मतदारसंघ हा गेले कित्येक वर्ष काँग्रेसचा गड बनला आहे. त्यामुळे या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार देण्याचा आव्हान महायुती समोर होतं.

हा मतदारसंघ आपल्याकडे राखावा यासाठी भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी इच्छुक होती. भाजपमधून माजी नगरसेवक किरण दगडे पाटील तर शिंदेंच्या शिवसेनेकडून कुलदीप कोंडे आणि बाळासाहेब चांदेरे इच्छुक होते.

Ajit Pawar Slams Uddhav Thackeray
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसनं सुनावलं! जागा मागण्यापूर्वी स्वतःची ताकद तपासा

अजित पवार यांच्याकडून रणजीत शिवतारे देखील निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येत होतं. आतापर्यंत महायुतीमध्ये ही जागा सातत्याने शिवसेनेकडे राहिली होती. त्यामुळे यंदा देखील शिंदे यांच्या शिवसेनेला ही जागा सुटेल असं बोललं जात होतं. मात्र ऐन वेळेस ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटल्यामुळे या ठिकाणी रणजीत शिवतारे हे उमेदवार होतील असं मानलं जात असतानाच अजित पवारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोरी केलेले जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या सप्राईज उमेदवारीने सर्वच अवाक झाले आहेत.

मांडेकर हे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी शिव संवाद दौरा देखील काढला होता. मात्र उमेदवारी पुन्हा एकदा संग्राम थोपटे यांना मिळाल्यानंतर ते नाराज होते त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज देखील दाखल केला होता. आता अजित पवार यांनी त्यांनाच आपलं उमेदवार केलं आहे.

या ठिकाणी भाजपच्या किरण दगडे पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले शिंदे सेनेतील नेते कुलदीप कोंडे देखील अपक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महायुतीला या बंडोबांना थंड करण्याचे काम देखील करावा लागणार आहे

मांडेकरांची हकालपट्टी

रात्री उशीरा त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com