Satbara Alert : जमिनीच्या व्यवहारात फसवणूक थांबणार! आता अवघ्या 50 रुपयांत मिळणार ‘अ‍ॅलर्ट’

Satbara property change alert : जमिनीच्या नोंदीत कोणताही बदल झाला की मोबाईलवर त्वरित अलर्ट मिळवा. अवघ्या 50 रुपयांत उपलब्ध या सेवेमुळे जमीन फसवणुकीपासून संरक्षण मिळू शकते.
Satbara Alert : जमिनीच्या व्यवहारात फसवणूक थांबणार! आता अवघ्या 50 रुपयांत मिळणार  ‘अ‍ॅलर्ट’
Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : जमिनीच्या मालकी हक्कात किंवा सातबारा उताऱ्यावर झालेल्या बदलांची माहिती मिळण्यास होणारा विलंब आणि त्यातून होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता कोणत्याही जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर अथवा मालमत्तेवर झालेला बदल थेट संबंधित मालकाच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविला जाणार आहे. यासाठी नागरिकांना केवळ ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

भूमी अभिलेख विभागाच्या ‘ई-फेरफार’, ‘ई-मोजणी’ आणि ‘ई-प्रॉपर्टी कार्ड’ या तीन प्रणाली एकत्र करून ‘महाभूमी’ पोर्टलवर ही नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे जमिनीच्या कागदपत्रांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

Satbara Alert : जमिनीच्या व्यवहारात फसवणूक थांबणार! आता अवघ्या 50 रुपयांत मिळणार  ‘अ‍ॅलर्ट’
Teacher News: शिक्षकांसाठी मोठी बातमी! वैयक्तिक मान्यतेसाठी डेडलाइन; सरकारचा नवा GR

अशी मिळणार माहिती

जमिनीच्या मालकी हक्कात किंवा सातबारा उताऱ्यावर काही फेरफार अथवा बदल झाल्यास त्याची माहिती संबंधित जमीनमालकाला एसएमएसद्वारे मिळणार आहे. ही सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांनी ‘महाभूमी’ पोर्टलवर जाऊन आधार कार्डच्या माध्यमातून नोंदणी करावी लागेल.

मोबाईलवर आलेल्या ओटीपीच्या सहाय्याने लॉगिन केल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव आणि संबंधित जमिनीचा सर्व्हे क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर सातबारा अथवा मालमत्ता पत्रकावर होणाऱ्या प्रत्येक बदलाची माहिती मिळण्यासाठी ५० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.

एकापेक्षा जास्त जमिनींसाठीही नोंदणी

एका व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा अधिक जमिनी असल्यास प्रत्येक जमिनीसाठी या सुविधेची नोंदणी करता येणार आहे. संबंधित जमिनीवर कोणताही बदल, फेरफार अथवा व्यवहाराची नोंद झाल्यास त्याची माहिती तातडीने मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे.

Satbara Alert : जमिनीच्या व्यवहारात फसवणूक थांबणार! आता अवघ्या 50 रुपयांत मिळणार  ‘अ‍ॅलर्ट’
Nashik Mahanagarpalika : शिंदे गटाच्या नगरसेवकाला मोठा धक्का! आधी नगरसेवकपद गेलं, आता थेट पोलिसांत गुन्हा दाखल

फसवणुकीला बसणार आळा

जमिनीच्या कागदपत्रांमध्ये परस्पर बदल करणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करणे किंवा मालकाच्या नकळत जमिनीची नोंद बदलणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. जमिनीच्या रेकॉर्डमध्ये झालेला प्रत्येक बदल मालकाच्या निदर्शनास तातडीने येणार असल्याने फसवणुकीचा मार्ग बंद होण्यास मदत होईल.

याशिवाय शासकीय जमिनींचे अनधिकृत व्यवहार रोखण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचे जमाबंदी आयुक्त शैलेश नवाळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com