Farmer Subsidy: शेतकऱ्यांसाठी १२ कोटींचे अनुदान! फळबाग लागवड, फुलशेतीपासून यांत्रिकीकरणापर्यंत विविध घटकांचा समावेश; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

Maharashtra government scheme: राज्य सरकारने २०२६-२७ साठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना १२.११ कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. फळबाग, शेडनेट, पॉलीहाऊस आणि कृषी यंत्रसामग्रीसाठी महाडीबीटीवर अर्ज करता येणार आहेत.
Farmer Subsidy
Farmer SubsidySarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra government scheme News : शेतकऱ्यांना फलोत्पादन क्षेत्राकडे वळविण्यासह आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी तब्बल १२ कोटी ११ लाख रुपयांच्या अनुदानाला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेतून फळबाग लागवड, फुलशेती, मसाला पिके, औषधी वनस्पती, संरक्षित शेती आणि यांत्रिकीकरण अशा विविध घटकांसाठी शेतकऱ्यांना ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

राज्यातील ३८ जिल्ह्यांमध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अनुदान कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, उत्पादनक्षमता सुधारणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

फळबागांपासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत लाभ

या योजनेतून अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना फळपिकांच्या लागवडीसाठी अनुदान मिळणार आहे. यामध्ये स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट, पॅशन फ्रूट, किवी, द्राक्ष, खजूर, केळी, आंबा, अननस, आवळा, पपई आणि अंजीर यांसारख्या फळपिकांचा समावेश आहे. याशिवाय सुटी फुले, कटफ्लॉवर, फुलशेती, भाजीपाला आणि मसाला पिकांच्या लागवडीसाठीही मदत दिली जाणार आहे.

Farmer Subsidy
Mahayuti Dispute : एका खुर्चीने वाढला राजकीय वाद, कदमांच्या कृतीने राष्ट्रवादीत नाराजी अन् भाजपमध्येही खदखद

संरक्षित शेतीला चालना देण्यासाठी शेडनेट हाऊस, पॉलीहाऊस, प्लास्टिक मल्चिंग, क्रॉप कव्हर, तणनियंत्रक आच्छादन आणि हरितगृह यांसारख्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्प्रेअर, फवारणी यंत्रे, पंप आणि अन्य कृषी अवजारांच्या खरेदीसाठीही अनुदान उपलब्ध होणार आहे.

Farmer Subsidy
Eknath Shinde: फडणवीसांनंतर शिंदेंनीही थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या घरी; कुटुंबासोबत केले जेवण अन् केली मोठी घोषणा!

अर्ज केल्यानंतरच मिळणार लाभ

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी घटकनिहाय अर्ज सादर करावेत. एकदा अर्ज निवड प्रक्रियेत समाविष्ट झाल्यानंतर त्याच घटकासाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

कृषी विभागाने पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.

https://mahadbt.maharashtra.gov.in

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.