

Bhimashankar Karjat Torrent Power Project: कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हा प्रकल्प भीमाशंकर अभयारण्यापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी भीमाशंकरच्या जंगलातील वन्यजीवांवर पर्यावरणावरही मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीचा दुष्परिणाम होण्याचा धोका आहे. याच पार्श्वभूमीवर खळबळजनक अपडेट समोर आली आहे.
राज्यातील विरोधक आणि पर्यावरणप्रेमी सामाजिक संस्थांनी महायुती सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच टोरंट पॉवर कंपनीसाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडत असून राजकारण तापलं आहे. याचदरम्यान, माहिती कार्यकर्ते विजय कुंभारांनी भीमाशंकर जंगलात 34 हजार झाडांची नव्हे,तर 90 हजार झाडांची कत्तल होणार असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
विजय कुंभार यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीशी संबंधित एक सोशल मीडियावरील X प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी भीमाशंकरप्रमाणेच राज्यात विविध 23 प्रकल्पांसाठी 23 ठिकाणी लाखो झाडांची कत्तल होणार असल्याचं विजय कुंभार यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारांनी राज्यात कर्जतमधील भीमाशंकरप्रमाणेच विविध 23 प्रकल्पांसाठी 23 ठिकाणी लाखो झाडांची कत्तल होणार असल्याच्या त्यांच्या दाव्याबाबतची कागदपत्रेही समोर आणले आहेत.
विजय कुंभारांनी पोस्टमध्ये म्हणतात,भीमाशंकरची वृक्षतोडच्या बदल्यात टोरंट कोयना धरण परिसरातील दोन गावांमध्ये वृक्ष लागवड करणार,असल्याचं सांगितलं आहे. मात्र,अद्यापतरी एकही झाड लावलं नाही, उलट कंपनीने त्या बदल्यात 3 कोटी 84 लाख रुपये देत,वृक्ष लागवड करण्याऐवजी हात वर केल्याचा धक्कादायक दावाही कुंभारांनी केला आहे.यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
साईडोंगर हा एकमेव प्रकल्प नाही; महाराष्ट्रात असे तब्बल २३ पंप्ड स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित आहेत!मग प्रत्येक ठिकाणी जनतेने आंदोलन करायचे आणि सरकारने प्रकल्पांचे समर्थन करायचे का? प्रत्येक भागाची भौगोलिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिस्थिती वेगळी आहे. पण सरकारला त्याचं काही देणंघेणं आहे की नाही? पर्यावरणाचा विचार न करता प्रकल्पांना पाठिंबा द्यायचा आणि जनतेला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवायचं, हाच सरकारचा विकास आहे का? असा संतप्त सवालही विजय कुंभारांनी आपल्या पोस्टमधून केला आहे.
यावेळी विजय कुंभारांनी त्यांच्या पोस्टमध्ये कंपन्यांच्या हितासाठी सरकारचा एवढा अट्टाहास,मग निसर्ग आणि जनतेच्या हितासाठी एवढीच तळमळ का नाही? प्रश्न एका साईडोंगरचा नाही; प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या भवितव्याचा असल्याचा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला आहे.
कर्जत तालुक्यातील टॉरंट पॉवरचा अंदाजे 13,500 कोटी रुपयांचा जलविद्युत व ऊर्जा साठवण प्रकल्प होत आहे. हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साईडोंगर-1 परिसरात उभारला जात आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हे स्थळ भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.