

Pune News : पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित झाला आहे. अजून त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, पराभव दिसताच शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप हे मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. शिक्षकांचा आमदार शिक्षकच व्हावा, यासाठी उभा केलेला लढा कमी पडल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदेंनी सानप यांना पाठींबा जाहीर केला होता. शिवसेनेची यंत्रणा देखील सानप यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी होती. मात्र, भाजपने एकनाथ शिंदेंचा डाव उलटवला. भाजपचे कौस्तुभ गावडे हे विजयाच्या उंबरड्यावर आहेत.
सानप म्हणाले, ''पाच जिल्हे आणि ५८ तालुक्यांचा समावेश असलेल्या मतदारसंघात कमी कालावधी मिळूनही शिक्षकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभूराज देसाई यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी दिलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरला. निकालात जी उणीव राहिली, ती माझी वैयक्तिक उणीव आहे. शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसाठी काम सुरूच ठेवणार आहे.''
आपला पराभव का झाला याचे देखील कारण सानप यांनी दिले. त्यांना, मतांची विभागणी झाल्यामुळे पराभव झाला का, या प्रश्नावर ते म्हणाले, हा थेट सामना आपल्यात आणि कौस्तुभ गावडे यांच्यातच झाला.मतांची विभागणी आमच्या दोघांमध्ये झाली. काही घटकांपर्यंत पोहोचण्यात आम्ही कमी पडलो असू. या उणिवा पुढील काळात दूर करू,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.