

Kerosene Distribution: अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरामध्ये गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे सबंध देशभरामध्ये नागरिकांना समस्यांना सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे नागरिकांची इंधनासाठी होणारी धावपळ कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने पुन्हा एकदा रॉकेल वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हे रॉकेल नेमकं कोणाकोणाला मिळणार याबाबतच्या देखील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार या महिन्यांमध्ये केरोसीन (रॉकेल) वितरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रतिशिधापत्रिका ३ लिटर केरोसीन देण्यात येणार आहे.
रॉकेल वितरणामध्ये अंत्योदय अंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना वितरणामध्ये प्राधान्य देण्यात येणार असून सर्वप्रथम अंत्योदय धारक असलेल्या शिधापत्रक धारक कुटुंबांना रॉकेलचे वितरण होणार आहे. त्यानंतर उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक कुटुंबांनादेखील रॉकेल वितरण करण्यात येईल. मात्र, ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका नसेल अशा कुटुंबांना आणि स्थलांतरित मजूर यांनाही वितरण केले जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीचा दाखला असणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
रॉकेलचा संपूर्ण कोटा वाटप दिनांकापासून ४५ दिवसांत उचलणे रॉकेल वितरकांना बंधनकारक असून, उर्वरित साठा पुढे नेण्यात येणार नाही. वितरण प्रक्रिया तेल कंपन्यांचे वितरक, किरकोळ परवानाधारक आणि रास्तभाव दुकानदार, लाभार्थी अशा टप्प्यांत वितरण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यास ३ लिटर प्रमाणे रॉकेल वाटप करणे आवश्यक असून, त्यासाठीचे दर हे जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित करणार आहे.
तेल कंपन्यांनी केरोसीनचा पुरवठा नियमित ठेवावा, तसेच पहिल्या पंधरवड्यात ८५ टक्के केरोसीन उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या केरोसीनचे वितरण तालुका स्तरावर तहसीलदारांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. गैरवापर टाळण्यासाठी तहसीलदार, पुरवठा अधिकारी आणि पोलिसांचा समावेश असलेले संयुक्त तपासणी पथक नेमण्यात येणार आहे.
केरोसीनचा वापर केवळ घरगुती कारणांसाठीच करण्यात यावा. भेसळ किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.
सर्व संबंधित विभागांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.