Manoj Jarange: शरद पवारांवरील जरांगेची टीका जिव्हारी! महायुतीनं स्क्रिप्ट दिल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आवाज उठवताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने सरकारवर सडकून टीका केली आहे.
Manoj Jarange Patil, Sharad Pawar
Manoj Jarange Patil, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आवाज उठवताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने सरकारवर सडकून टीका केली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जरांगे पाटील क्वचितच टीका करताना दिसले आहेत. आज जरांगे पाटील यांनी शरद पवार यांनी आमचं वाटोळच केला असल्याची टीका केली आहे. ही टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाच्या चांगली जिव्हारी लागले असून पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

Manoj Jarange Patil, Sharad Pawar
Bar Council of India: CJI गवईंचं मन मोठं, पण बार काऊन्सिलनं 'त्या' वकिलाला मोठा दणका दिलाच!

प्रशांत जगताप म्हणाले, सध्या राज्यामध्ये जातीचा आणि धर्माचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालला आहे. आधी लोकसभा नंतर विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महायुतीला मदत करणारे जे घटक आहेत ते राज्यातील आरक्षणाची लढाई कशी चिघळेल यासाठी प्रयत्न करत आहे.

Manoj Jarange Patil, Sharad Pawar
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेचं बिगुल वाजलं! 'इतक्या' टप्प्यात मतदान, 'या' दिवशी निकाल; निवडणूक आयोगाची घोषणा

1995 पासून शरद पवार महाराष्ट्रातील कोणत्याही घटनात्मक पदावर नाहीत. 1999 पासून कोणतेही घटनात्मक पद शरद पवार यांच्या पक्षाकडे नाही. म्हणजेच मुख्यमंत्रीपद आमच्या पक्षाकडे आलेलं नाही. उपमुख्यमंत्री पद आमच्याकडे होतं मात्र ते फक्त देखाव्याचे पद आहे. अशा परिस्थितीत शरद पवार वर टीका केल्याशिवाय राज्यातील खासदार मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना झोप येत नाही तसेच आता अलीकडच्या काळामध्ये तर सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये देखील शरद पवार यांच्यावर टीका करण्याची चढाओढ लागलेली आहे.

Manoj Jarange Patil, Sharad Pawar
Floods: महापूराची पहाणी करायला गेलेल्या भाजप आमदार-खासदाराला बेदम मारहाण; केलं रक्तबंबाळ

यापूर्वी ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके हे सातत्याने टीका करत होते. आता मनोज जरांगे पाटील देखील टीका करू लागले आहेत. मात्र कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांच्या सर्टिफिकेटची गरज शरद पवार यांना नाही. शरद पवार यांनी जे मागच्या 68 वर्षांमध्ये मोठे सामाजिक कार्य उभं केलं आहे त्यामुळे अशा टीकाना आम्ही महत्त्व देत नाही.

Manoj Jarange Patil, Sharad Pawar
Gautami Patil: पुण्यातील अपघातप्रकरणी गौतमी पाटीलवर कारवाई होणार नाही! पुणे पोलिसांनी केलं स्पष्ट

शरद पवार यांनी मराठा समाजा सोबतच इतर समाजासाठी देखील आर्थिक महामंडळात माध्यमातून मोठे योगदान केलं आहे. असं असताना देखील शरद पवार यांच्यावर टीका होत असल्याने महायुती सरकारच विविध घटकांना स्क्रिप्ट देत आहे की काय अशी शंका येते. जे शरद पवार गेले 30 वर्ष राज्यातील कोणत्याही घटनात्मक पदावर नाहीत त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी आत्मचिंतन करणे आवश्यक असून राज्यात आणि देशांमध्ये जे सत्ताधारी आहेत. त्यांना जाब विचारण्याचे सोडून शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा धंदा बंद करावा असा इशारा जगताप यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com