पुणे : कोरोना महामारीत (Corona epidemic) अनेकांनी आपल्या आप्तजनांना गमावले. अनेकांनी घरातील कर्ता माणूस गमावला, ही कुटुंबात या वर्षी दिवाळी साजरी होण्याची कोणतीच शक्यता नाही. पण या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी व त्यातून त्यांना सावरण्यासाठी शहराचा प्रथम नागरिक म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी एका उपक्रमाची घोषणा केली आहे. कोरोना संसर्गामुळे आपल्या आप्तजनांना गमावलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी महापौर मोहोळ यांच्या वतीने संदेशपत्र आणि दिवाळीचा फराळ पोचविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी रविवारी (३१ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुण्यात गेल्या वर्षभरात कोरोनामुळे सुमारे ५ हजार जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पण कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास वर्षभर कोणताही सण साजरा केला जात नाही. परंतू दिवाळीचा सण अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आहे. हाच प्रकाशाचा मार्गातून कोरोना काळात आपली प्रिय व्यक्ती गमावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होणार आहे. या कुटुंबीयांना संदेशपत्र व फराळ घरपोच दिला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. गेल्यावर्षी देखील हा उपक्रम राबवून सुमारे साडे चार हजार कुटुंबांना संदेशपत्र व फराळ पोहचवण्यात आला होता.
तसेच, ज्यांनी कुटुंबातील आपल्या प्रिय सदस्यांना गमावले आहे, त्यांचे दुःख कमी करता येणार नसले तर होणारे नसले तरी अशा कुटुंबांना आधार देण्याच्या प्रयत्न सुरू आहे. या कुटुंबांचा दुःखाचा डोंगर मागे सारून नवी पहाट या आणणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पुण्यातील ५ हजार कुटुंबांपर्यंत संदेशपत्र व फराळ पोहचवला जात आहे.’’ असेही महापौर मोहोळ यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.