Medha Kulkarni Controversy : मेधा कुलकर्णीच्या हातातून देवाचा फोटो हिसकावला अन् पोलिस पळत सुटला ..., दर्गा परिसरात हायव्होटेज ड्रामा

Medha Kulkarni Police Manchar : खासदार कुलकर्णी यांच्या हातातील फोटो हिसकावला आणि एक पोलीस तो फोटो घेऊन पण काढत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Medha Kulkarni speaks about the alleged Pandav-era stepwell near a dargah in Manchar, triggering a political and social debate.
Medha Kulkarni speaks about the alleged Pandav-era stepwell near a dargah in Manchar, triggering a political and social debate.sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात दर्गा आणि पांडवकालीन बारव यासंबंधीचा वाद आता पुन्हा तीव्र झाला आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी मंचरमधील या ठिकाणाला भेट दिली. आणि वादग्रस्त ठरलेल्या दर्ग्याची आणि पांडवकालीन बारव परिसराची पाहणी केली.

यावेळी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. पाहणी दरम्यान वादग्रस्त भागामध्ये मेधा कुलकर्णी यांना नव्याने काही काम करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्या आक्रमक झाल्या आणि स्वतः सोबत आणलेल्या देवी-देवतांचा फोटो त्या ठिकाणी त्यांनी स्थापन करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी काही प्रमाणात त्यांची आणि पोलिसांची झटापट झाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या हातातील फोटो हिसकावला आणि एक पोलीस तो फोटो घेऊन पण काढत असल्याचं पाहायला मिळाले. मेधा कुलकर्णी या त्यांच्या मागे जाऊन तो फोटो घेण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र इतर पोलिसांनी त्यांना त्यापासून रोखण्याचा पाहायला मिळालं.

याबाबत मेधा कुलकर्णी यांनी आपली भूमिका मांडली आहे. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पांडवकालीन बारव जवळ अनधिकृत दर्गा तसेच सहा महिन्यापूर्वीपर्यंतच्या मोकळ्या जागेवर स्मशानभूमी आणि 2021 साली दिवंगत झालेल्या व्यक्तीचे तथाकथित थडगे कसे आले हा आमचा सवाल आहे.

मंचर येथे पांडवकालीन बारव या ठिकाणी आहे. प्रत्यक्ष शिलालेख, गोमुख, दगडी बांधकाम यांवरून येथील हिंदू पद्धतीच्या बांधकामाचे पुरावे मिळतात. अशा ठिकाणी काही वर्षांपासून अनधिकृत दर्गा बांधण्यात येऊन आणि वक्फ म्हणून जाहीर केला आहे.

Medha Kulkarni speaks about the alleged Pandav-era stepwell near a dargah in Manchar, triggering a political and social debate.
Satara ZP President : सातारा झेडपीचा अध्यक्ष 20 मार्चला ठरणार; पण कलेक्टरच्या ‘त्या’ विधानाचीच चर्चा!

याची तक्रार पुणे जिल्हाधिकारी तसेच पुणे ग्रामीण पोलिस यांच्याकडे वारंवार करून सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही. उलट या बांधकामामध्ये वाढ झाली असून, गेल्या सहा महिन्यापूर्वी जी जागा पाहाणी मध्ये प्रांत अधिकारी यांना मोकळी आढळली, त्या ठिकाणी आता स्मशानभूमी सदृश देखावा तयार केलेला आहे.

एवढेच नाही तर 2021 ला दिवंगत असलेल्या व्यक्तीचे थडगे दाखवण्यात आले आहे. सहा महिन्यापूर्वी अस्तित्वात नसलेल्या स्मशानभूमीत 2021 सालचे थडगे कसे असू शकते? ही सगळी विसंगती असून सुद्धा कोणतीही कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी भेट देऊन आंदोलन केले.

...तर आंदोलन करणार

डीवायएसपी यांनी एसपी पुणे यांच्याशी चर्चा करून तसेच प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करून आठ दिवसात कारवाई करतो असे आश्वासन दिले आहे. ही कारवाई न झाल्यास स्थानिक कार्यकर्त्यांसह अधिक प्रखर आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

Medha Kulkarni speaks about the alleged Pandav-era stepwell near a dargah in Manchar, triggering a political and social debate.
अजित पवारांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार हे किती कोटींचे मालक; एकूण संपत्ती किती?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com