Dilip Mohite: माजी आमदारानं विरोधकांना केलं 'चितपट' ; माझ्या पाहुण्यांनीच मला विधानसभेत खाली पाडलं, आता...

Maharashtra MLA Controversy: विधानसभा निवडणुका झाल्यानंतर खेड तालुक्यात निवडणुकीतील पराभवावर चर्चा झडत आहेत. मोहिते-पाटलांनी कुस्त्याच्या आखाड्यात विरोधकांना 'चितपट'केलं.
Dilip Mohite Patil
Dilip Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Chakan (Pune): गावची यात्रा-जत्रा असो की कुस्त्यांच्या आखाडा, राजकीय नेते बोलायची आणि टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, याचा प्रत्यय नुकताच पुणे जिल्ह्यात आला. विरोधकांना टोला मारण्याची संधी माजी आमदारांनी सोडली नाही.

खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पुन्हा ते राजकारणात सक्रिय झालेले आहेत. विविध गावाच्या कार्यक्रमांना ते आवर्जून भेट देत आहेत. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर खेड तालुक्यात निवडणुकीतील पराभवावर चर्चा झडत आहेत. मोहिते-पाटलांनी कुस्त्याच्या आखाड्यात विरोधकांना 'चितपट'केलं.

गावच्या यात्रेनिमित्ताने आयोजित केलेल्या पैलवानांच्या मातीवरील कुस्तीच्या आखाड्यात माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना कानपिचक्या दिल्या. आपल्या विरोधकांचे लक्ष वेधत ते म्हणाले, "तुम्हीही आखाड्यात? या पाहुण्यांनीच मला खाली पाडलं," असा चिमटा त्यांनी राजकीय विरोधकांना घेतला. खालुंब्रे ता.खेड येथील पैलवान्यांच्या आखाड्यात ते बोलत होते.

Dilip Mohite Patil
Justice Dinesh Kumar Sharma: हा न्यायाधीश नको रे बाबा ! वकील उतरले रस्त्यावर; कोण आहेत दिनेश कुमार शर्मा

"मी आखाड्यात उतरलो आहे. मला कोणताही आखाडा नवीन नाही. मला माझ्या पाहुण्यांनीच विधानसभेला खाली पाडलं. आता त्यांनी आखाड्यात आलं पाहिजे," असा टोला माजी आमदार मोहितेंनी हाणला. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ, पहिलवानांमध्ये हशा पिकला. संधी साधत मोहितेंनी विरोधकांना 'चितपट'केलं.

Dilip Mohite Patil
Yashwant Varma: न्यायाधीशांच्या घरातून जळालेल्या नोटा काढणारी व्यक्ती कोण?? सुप्रीम कोर्टाचे तीन प्रश्न; वर्माचं उत्तर....

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, अमोल पवार, गणेश बोत्रे, राजू बोत्रे,दिलीप बोत्रे, दत्तात्रय बोत्रे, संदीप बोत्रे, मनोज बोत्रे, मनोज खांडेभराड,विशाल पऱ्हाड,सुभाष बोत्रे,खंडू पवार, जिल्ह्यातून आलेले कुस्तीगीर पैलवान, ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com