MLC Election : सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? चर्चेत नसलेल्या दोघांनी विधान परिषदेसाठी अर्ज नेले! 'ती' यादी समोर!

MLC Election Sunetra Pawar NCP : विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांनी कंबर कसली असून, अर्ज नेणाऱ्यांमध्ये अनेक बड्या चेहऱ्यांचा समावेश आहे.
Sunetra Pawar MLC Election
Sunetra Pawar MLC ElectionSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर जाण्यासाठी राजकीय नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या दिग्गजांसह इच्छुकांनी गर्दी केल्याने अनेक 'इंटरेस्टिंग' नावे आता समोर आली आहेत.

महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला सुटली असून, उमेदवारीसाठी पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा 'राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी' असाच हायव्होल्टेज सामना रंगण्याचे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पिंपरी चिंचवडे नगरसेवक संदीप वाघेरे तसेच राजेंद्र जासूद या दोघांनी विधान परिषदेसाठी अर्ज नेले आहेत. त्यामुळे पक्षाकडून आदेश आहे की स्वतःची तयारी म्हणून हे अर्ज नेले आहेत, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, उमेदवारी दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस बाकी असताना हे अर्ज नेले असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवार या दोघांपैकी एकाला संधी देणार की ऐनवेळी वेगळेच नाव समोर येणार याची चर्चा आहे.

भाजपकडून देखील तयारी?

विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांनी कंबर कसली असून, अर्ज नेणाऱ्यांमध्ये अनेक बड्या चेहऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये भाजपकडून गणेश बिडकर, प्रदीप कंद यांचा समावेश आहे. त्यामुळे ही जागा भापला सुटेल, अशी अपेक्षा या नेत्यांना आहे, अशी चर्चा आहे.

काँग्रेस, शिवसेना

महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे राहणार आहे. या पक्षातील श्रीकांत पाटील, तुषार कामठे यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर, काँग्रेसकडून गोपाळ तिवारी यांनी अर्ज नेले आहेत. तर, शिंदेंच्या शिवसेनेकडून महेश शेवकरी, सुवर्णा राक्षे यांनी अर्ज नेले आहेत.

Sunetra Pawar MLC Election
Nashik MLC Election : नाशिकच्या जागेवरुन आधीच शिवसेना-भाजपमध्ये ओढाताण, त्यात आता हळूच राष्ट्रवादीची एण्ट्री

एबी फाॅर्म कोणाला?

पक्षांच्या अधिकृत आणि इच्छुक नेत्यांशिवाय काही अपक्ष उमेदवारांनीही अर्ज नेल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र विशेष म्हणजे जी नाव राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी आघाडीवरती आहेत त्या नेत्यांनी पक्षाकडून सूचना न मिळाल्याने अद्याप अर्जच नेला नसल्याचs समोर आले आहे. पक्ष कोणाला एबी फॉर्म देणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

रस्सीखेंच पण जागा राष्ट्रवादीकडेच?

पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागेसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे. या जागेवरून महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दिल्लीत झालेल्या अंतिम चर्चेनुसार, पुण्याची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याचे समजते. जागा जरी निश्चित झाली असली, तरी महायुतीकडून अधिकृत उमेदवार कोण असणार? याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संख्याबळाचे गणित?

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण ८६७ मतदार आहेत. यामध्ये महायुतीकडे तब्बल ७०० पेक्षा अधिक मतदारांचे संख्याबळ आहे, तर महाविकास आघाडीकडे जेमतेम ४८ जागांचे संख्याबळ असल्याचे दिसते. कागदावर हे पारडे एका बाजूला झुकलेले दिसत असले, तरी स्थानिक पातळीवरील छुप्या युत्या आणि राजकीय समीकरणे यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उमेदवारी अर्ज घेणाऱ्या नेत्यांची यादी

उमेदवारी अर्ज घेणाऱ्या नेत्यांची यादी

राष्ट्रवादी काँग्रेस : संदीप वाघेरे, राजेंद्र जासूद.

शिवसेना (शिंदे गट): महेश शेवकरी, सुवर्णा राक्षे.

काँग्रेसकडून: गोपाळ तिवारी.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) : श्रीकांत पाटील, तुषार कामठे.

Sunetra Pawar MLC Election
MLC election : विधानपरिषद निवडणुकीत भाजपला 2 मतदारसंघात धोक्याची घंटा : अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवार डेंजर झोनमध्ये

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com