हम बाप है तुम्हारे, हमे ज्ञान नहीं देते! 'राज'सभेनंतर दुसऱ्याच दिवशी वसंत मोरेंची गुगली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी पुण्यात सभा झाली.
MNS Vasant More Latest Marathi News
MNS Vasant More Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) शहराध्यक्ष नेते वसंत मोरे रविवारी पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला व्यासपीठावर पहिल्या रांगेत होते. शेकडो दुचाकींच्या ताफ्यात त्यांनी सभास्थळ गाठलं होतं. पण अंतर्गत गटबाजीवर तिथंही त्यांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली. आता राज ठाकरे यांच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी हिंदी चित्रपटातील डायलॉग असलेला सूचक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. (MNS Vasant More Latest Marathi News)

वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओची सुरूवातच इशारा देणारी आहे. 'ऐसी वैसी बातों पर ध्यान नहीं देते, हम बाप है तुम्हारे, हमें ज्ञान नहीं देते,' असा हा डायलॉग आहे. त्यामुळे मोरे यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. हा व्हिडीओ टाकताना त्यांनी 'जास्त सिरीयस घेवू नका सहजच टाकलंय,' असंही म्हटलं आहे.

MNS Vasant More Latest Marathi News
वसंत मोरे थाटात आले पण नाराजी कायम! सभेच्या ठिकाणी येताच म्हणाले,

व्हिडीओमध्ये हिंदी चित्रपटातील 'देख तेरा बाप आया..,' हे गाणं आहे. त्यामुळे मोरे यांची ही पक्षातील विरोधकांवर टाकलेली गुगली तर नाही ना, अशा चर्चाही सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून वसंत मोरे पक्षांतर्गत विरोधकांवर उघडपणे बोलत आहेत. ते मनसे सोडणार असल्याचीही चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. पण त्यांनी पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, रविवारी सभेच्या ठिकाणी आल्यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, ज्याठिकाणी राजसाहेब तिथे मी उपस्थित राहत असतो. मी पक्षातच आहे. गेल्या महिनाभरापासून खटके उडत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. सध्या चित्र बदलले आहे, असं सूचक वक्तव्य मोरे यांनी केलं होतं.

MNS Vasant More Latest Marathi News
राजकारण, विश्वासार्हता म्हणजे काय रे भाऊ? आव्हाडांनी राज ठाकरेंना समजावून सांगितलं...

पक्षाचे प्रमुख राज ठाकरे हे पक्ष कार्यालयात येतील त्याचवेळी तिथे पाय ठेवेन, असा जाहीर निर्धारही मोरेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. यामुळे मनसेतील वाद समोर आला होता. सभेच्या तयारीतही वसंत मोरे सक्रीय नसल्याची चर्चा होती. मागील काही दिवसांपासून पक्षाच्या बैठकांमध्येही त्यांना डावलेले जात असल्याचा आरोप मोरे हे सातत्याने करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com