पवारांविषयी चुकीची कॉमेंट करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला खासदार बापटांनी झापले

जे लिहिले आहे ते अत्यंत चुकीचे व आपल्या संस्कृतीला न शोभणारे आहे.
गिरीश बापट
गिरीश बापट सरकारनामा
Published on
Updated on

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मिडीयावर चुकीच्या भाषेत पोस्ट लिहिणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला भाजपाचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी जाहीरपणे झापले आहे. खासदार बापट यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहून या कार्यकर्त्याला जाणीव करून दिली आहे. अशा पद्धतीने टीका करणे आपल्या पक्षाच्या संस्कृतीत बसत नाही.आपण कुणावर आणि कोणत्या भाषेत टीका करतो, याचे भान बाळगावला हवे, असे खासदार बापट यांनी या कार्यकर्त्याला सुनावले आहे.

गिरीश बापट
अमित शाहंचा बहुचर्चित पुणे-नगर दौरा तात्पुरता स्थगित

कार्यकर्त्याने ज्येष्ठ नेते पवार यांच्याविषयी लिहिलेल्या पोस्टवर खासदार बापट म्हणतात, ‘‘ सोशल मिडीयावर या कार्यकर्त्याची पोस्ट पाहिली व दुःख झाले. ज्येष्ठ नेते पवार यांच्या संदर्भात त्यांनी जे लिहिले आहे ते अत्यंत चुकीचे व आपल्या संस्कृतीला न शोभणारे आहे. राजकीय जीवनात मतभेद जरूर असतात ते चांगल्या भाषेत व्यक्तही करता येतात. त्याला कोणाचीही हरकत नसते पण महाराष्ट्रातल्या दंगली व शरद पवार यांनी त्यावर दिलेली प्रतिक्रिया यावर सगळे सहमत असतील असे नाही. ज्येष्ठ नेते पवार यांचे ते व्यक्तिगत मत असू शकेल किंवा पक्षाचे मत असू शकेल राजकीय चर्चा होतच राहतील पण ज्या पद्धतीने व्यक्तिगत टीका व शेवटचे वाक्य लिहिले आहे त्याच्याशी मी पूर्ण असहमत आहे.’’

गिरीश बापट
एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी; अन् आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी

कार्यकर्त्यांनी आपली उंची व आपण कोणाबद्दल बोलतो याचे भान ठेवणे आवश्यक आहे. हे सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना बंधनकारक आहे आणि म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काही राजकीय उत्तर भाजपाला द्यायचे असेल तर भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व किंवा भाजपाचे महाराष्ट्र नेतृत्व जरूर उत्तर देईल.आपले वय अनुभव ज्या व्यक्तीवर आपण अशा पद्धतीने लिहितो हे भाजपाच्या संस्कृतीला धरून नाही आणि म्हणून मी यासंबंधी पूर्ण असहमती दर्शवतो. अशा पद्धतीने उत्तर देणे हे चुकीचे आहे असे माझे स्पष्ट मत मी जाहीरपणे मांडतो. आपण आपल्या उंचीप्रमाणे व अनुभवाप्रमाणे व कार्य क्षेत्राप्रमाणे काम करावे सगळ्या देशाची व राज्याची जबाबदारी आपल्यावर नाही. माझ्यासारखा गेली चाळीस-पन्नास वर्षे राजकीय जीवनात काम करणारा कार्यकर्ता ही पथ्य पाळतो आहे आणि म्हणून भाजपाच्या या कार्यकर्त्याने चुकीच्या पद्धतीने मांडणी केलेल्या पोस्टचा मी निषेध करतो, असे खासदार बापट यांनी लिहिले आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com