

Shrirang Barne : नवलाख उंबरे (ता. मावळ, जि. पुणे) येथील लार्सन अॅन्ड टुब्रो कंपनीने कामावरून काढून टाकलेल्या २३६ कामगारांना १ डिसेंबरपर्यंत कामावर घेतले नाही, तर २ डिसेंबरला तळेगाव एमआयडीसी बंद केली जाईल, असा इशारा मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Ncp) आमदार सुनील शेळके यांनी काल दिला होता. त्यानंतर मावळचे खासदार आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे (Shivsena) उपनेते श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हे ही आता या कामगारांना न्याय मिळावा म्हणून मैदानात उतरले आहेत.
पुन्हा कामावर घेण्याकरिता या कामगारांचे गेल्या ४३ दिवसांपासून पुण्यातील कामगार उपायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु आहे. त्यांना कामावर घ्यावे म्हणून खा. बारणे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच आज साकडे घातले. उद्योगमंत्री उदय सामंत, कामगारमंत्री सुरेश खाडे आणि कामगार आयुक्तांनाही त्यांनी निवेदन दिले.
नमूद करण्याजोगी बाब म्हणजे हे कामगार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेना या कामगार संघटनेचे सदस्य आहेत. मात्र, ते बारणे यांच्या मतदारसंघातील असल्याने ते या लढ्यात उतरले आहेत. या स्थानिक कामगार भूमिपुत्रांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मनसेने या कामगारांना अगोदरच पाठिंबा दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एल अॅन्ड टी कंपनीकडून सुरु असलेल्या पिळवणूक, शोषणाविरोधात या कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले. त्या रागातून कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्या बदल्या करणे, कामावरुन काढणे, मानसिक त्रास देणे असा प्रकार सुरु केला. त्यामुळे न्याय, हक्कांसाठी या भूमीपूत्रांनी 19 ऑक्टोबर पासून पुण्यात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले. त्याला सव्वा महिना उलटूनही कंपनीने सहकार्याची भूमिका अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे आपण यामध्ये लक्ष घालून भूमीपूत्र कामगारांना न्याय द्यावा, अशी विनंती बारणेंनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि कामगारमंत्र्यांना केली आहे.
कामगार कोणत्या पक्षाचे काम करतात यापेक्षा त्यांच्यावर कंपनी प्रशासनाकडून अन्याय होत आहे, म्हणून त्यांना समर्थन देत त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, असे बारणे म्हणाले. याप्रश्नी उद्योगमंत्री आणि कामगारमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. तो सोडविण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनाही या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यामुळे लवकरच या कामगारांना दिलासा मिळेल असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.