Supriya Sule News : बीडचा माणूस बारामतीमध्ये 'तुतारी'वर लढतो, हे तर षडयंत्र !

Baramati Lok Sabha Constituency : बारामती लोकसभा चिन्हाच्या वादावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया...
Supriya Sule Latest News
Supriya Sule Latest NewsSarkarnama

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी उमेदवारांना निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आली. या चिन्ह वाटपात सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला 'तुतारी' हे चिन्ह देण्यात आले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली असून, थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष विरोधात षढयंत्र असल्याचं सांगितले आहे.

बारामतीतील निवडणूक लढवण्यासाठी 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची 20 एप्रिलला छाननी झाली. यामध्ये पाच अर्ज बाद करण्यात आले, तर 46 अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बारामती मतदारसंघातून 38 उमेदवार रिंगणामध्ये राहिले आहेत.या 38 उमेदवारांना सोमवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये विविध चिन्हांचे वाटप करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule Latest News
MNS News : मनसे पदाधिकाऱ्यांना 'मोतीबागेची' भुरळ !

बारामती (Baramati) मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या शेख यांनी चिन्हांच्या पहिल्या पसंतीक्रमात 'तुतारी' या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून हे चिन्ह त्यांना देण्यात आले आहे. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या तुतारी फुकणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तुतारी हे चिन्ह दुसऱ्या उमेदवारास दिल्यास मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

या प्रकारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून, असं करू नये हा आमच्या वरती अन्याय आहे असं सांगितलेलं आहे. हा अन्याय दोन्ही उमेदवारांवर असून, अपक्ष उमेदवार शेख यांच्यावर देखील हा अन्याय आहे. एक तर शेख हे बीडचे (Beed) कोण गृहस्थ आहेत जे बारामतीमध्ये लढायला आले आहेत. ते कोण आहेत? कुठून आलेत ? हे आम्हाला माहिती नाही परंतु हा त्यांच्या वरती आणि माझ्यावरतीही अन्याय आहे. सांगायचं झालं तर हा रडीचा डाव असल्याचा आरोपदेखील सुप्रिया सुळे यांनी केला.

Supriya Sule Latest News
Parth Pawar Y Plus security : उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना 'वाय प्लस' सिक्युरिटी !

आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. मात्र, अशा प्रकारची घटना वर्धा (Wardha) येथेदेखील घडली आहे. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन उमेदवार उभा आहे. तिथेच तुतारी हे चिन्ह एखाद्या अपक्ष उमेदवाराला दिलं गेलं आहे. त्यामुळे अर्थातच हे आमच्या विरोधात षडयंत्र आहे. वर्धा येथे अशा प्रकारे जेव्हा आक्षेप घेण्यात आला तेव्हा ते चिन्ह विड्रॉ करून मागे घेण्यात आलं. वर्ध्याला मान्य केला असताना बारामतीमध्ये हे चिन्ह देणे चुकीचे असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

(Edited by : Chaitanya Machale)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com