TVK Government : तमिळनाडूत लवकरच मोठी राजकीय उलथापालथ; थलापती विजय यांचे सरकार कोसळणार? स्टॅलिन यांचा खळबळजनक दावा

Tamil Nadu Politics : "विजय यांचे सरकार स्थिर नाही. कोणत्या क्षणी आणि कोणत्या टप्प्यावर त्याचा तोल जाईल व ते अचानक कोसळेल हे सांगता नाही. त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय की, राज्यात कधीही निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्या तीन महिन्यांतही होऊ शकतात किंवा सहा महिन्यांतही. "
MK Stalin Claim, Thalapathy Vijay
DMK leader MK Stalin addresses party workers during a mass induction event in Chennai, discussing the political future of the TVK government and possible early elections in Tamil Nadu.Sarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu Politics : द्रविड मुनेत्र कळघम (DMK) चे अध्यक्ष तथा तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी थलापती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) सरकारबाबत मोठा दावा केला आहे. विजय यांचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही, असं स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.

आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, "राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकांच्या तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

चेन्नईत माजी एआयएडीएमके मंत्री बेंजामिन यांच्या नेतृत्वाखाली विविध राजकीय पक्षांतील ५ हजारांहून अधिक नेते आणि कार्यकर्त्यांनी डीएमकेमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

MK Stalin Claim, Thalapathy Vijay
Byculla Capsule Case : भायखळ्यात मोहरममध्ये उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटणाऱ्या आरोपीची हादरवणारी कबुली, पत्नी सोडून गेली अन्...

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले, "वास्तवाकडे पाहण्याची गरज असून सध्याच्या सत्ताधारी पक्षाला स्वबळावर स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमत मिळवता आले नव्हते. विजय यांचे सरकार स्थिर नाही. कोणत्या क्षणी आणि कोणत्या टप्प्यावर त्याचा तोल जाईल व ते अचानक कोसळेल हे सांगता नाही.

त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय की, राज्यात कधीही निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्या तीन महिन्यांतही होऊ शकतात किंवा सहा महिन्यांतही. आपण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याची वाट पाहून चालणार नाही."

MK Stalin Claim, Thalapathy Vijay
Nasrapur Murder Case : नराधम भीमराव कांबळेला फाशीचीच शिक्षा! संपूर्ण महाराष्ट्र हादरवणाऱ्या नसरापूर प्रकणातील चिमुरडीला अखेर न्याय मिळाला

दरम्यान, यावेळी पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या सदस्यांना मार्गदर्शन करताना स्टॅलिन यांनी मोठं आवाहन केलं. ते म्हणाले, "निवडणूक जाहीर होण्याची वाट पाहण्याऐवजी डीएमकेने आतापासूनच तळागाळात तयारीला सुरुवात करावी, मी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन करतो.

निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. निवडणुका केव्हाही झाल्या तरी आपण शंभर टक्के तयारीत असले पाहिजे. याच क्षणापासून पक्षाच्या विजयासाठी गांभीर्याने कामाला लागा, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता खरंच तमिळनाडूत काही राजकीय उलथापालथ होणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com