Pune Drug Racket : आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड भाव असलेले अल्प्राझोलम पुण्यात सापडल्याने मोठी खळबळ

Drug Mafiya: 'एनसीबी'ने पुणे जिल्ह्यात तब्बल 200 किलो अल्प्राझोलम जप्त केले
Alprazolam and NCB
Alprazolam and NCB Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यातील ससून रुग्णालयात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश काही दिवसांपूर्वी करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी ललित पाटीलच्या नाशिकमधील कारखान्यावरही छापे टाकून कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ससूनमधील या प्रकारानंतर अमली पदार्थविरोधी पथक (एनसीबी) अॅक्शन मोडवर आले आहे.

आता मुंबईतील अमली पदार्थविरोधी पथकाने पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर तालुक्यात छापे टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 'एनसीबी'ने तब्बल 200 किलो अल्प्राझोलम जप्त केले आहे. पुणे जिल्ह्यात अल्प्राझोलम सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या अल्प्राझोलमला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड भाव असल्याचे सांगितले जाते.

Alprazolam and NCB
Drug Mafia Lalit Patil News : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून राजकारण तापलं; राज्य सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

पुण्यातील जुन्नर आणि शिरूर तालुक्यांत अल्प्राझोलमची बेकायदा निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती 'एनसीबी'ला मिळाली होती. यानंतर एनसीबीने जुन्नर आणि शिरूर परिसरात छापे टाकले असता, तब्बल 200 किलो अल्प्राझोलम आढळून आले. यानंतर 'एनसीबी'ने हे अल्प्राझोलम जप्त करत यासंदर्भातील माहिती स्थानिक पोलिसांना दिली. तसेच या प्रकरणाची पुढील कारवाई सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, अल्प्राझोलमचा वापर मनोविकारासाठी लागणाऱ्या औषधांसाठी करण्यात येतो. मात्र, त्यासाठी अन्न, ओैषध प्रशासन विभागाची मंजुरी लागते, पण या अल्प्राझोलमचा वापर अमली पदार्थ तयार करण्यासाठी करण्यात येत असल्याचा संशय 'एनसीबी'च्या अधिकाऱ्यांना असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Alprazolam and NCB
Lalit Patil News : ड्रगमाफिया ललित पाटीलचा साथीदार अभिषेक बलकवडेच्या घरी आढळले तीन किलो सोने; पुणे पोलिसांची कारवाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com