Ajit Pawar-Sharad Pawar : "झालं गेलं गंगेला मिळालं, माझंही साहेबांवर प्रेम" : अजितदादांचे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होण्याचे संकेत

Ajit Pawar-Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांनी यापूर्वी यावर संकेत दिला होता.
Ajit Pawar and Sharad Pawar’s NCP factions may reunite ahead of Maharashtra’s upcoming local body elections.
Ajit Pawar and Sharad Pawar’s NCP factions may reunite ahead of Maharashtra’s upcoming local body elections.Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar-Sharad Pawar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांना यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "प्रस्ताव आला असल्याचा आणि त्यावर दोन दिवसांत निर्णय घेणार आहे" असे म्हणत दुजोरा दिला होता.

आता "झालं गेलं गंगेला मिळालं... माझंही साहेबांवर प्रेम" असं म्हणत हा निर्णय सकारात्मक असणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. बारामतीत गुरुवारी (ता. 13) बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या मुलाखतीनंतर झालेल्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

मेळाव्यात बोलताना अजित पवार यांना एका कार्यकर्त्याने चिठ्ठी आणून दिली. यात लोकसभा निवडणुकीबाबत काही नमूद केले होते. या चिठ्ठीवर व्यक्त होताना अजित पवार यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला. खासदारकीला अस झालं, आमदारकीला असं झालं, असलं काही तुम्ही मला सांगू नका. शेवटी सगळे मतदार आपलेच आहेत, असे म्हणत आगामी वाटचाल दिशा स्पष्ट केली.

Ajit Pawar and Sharad Pawar’s NCP factions may reunite ahead of Maharashtra’s upcoming local body elections.
Supriya Sule- Ajit Pawar Alliance : सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना युतीचा प्रस्ताव, शहराध्यक्ष योगेश बहलांचा गौप्यस्फोट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

अजित पवार पुढे म्हणाले, काय झालं, एका बाजूला आदरणीय पवारसाहेब आणि एका बाजूला अजित पवार. बारामतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण होणारच ना? का काहींचं प्रेम साहेबांवर नसावं? असलं पाहिजे, माझंही प्रेम आहेच ना. पण मी काही राजकीय भूमिका घेतली, याचा अर्थ काहीतरी वेगळा छोटा विचार करणे चुकीचे आहे.

Ajit Pawar and Sharad Pawar’s NCP factions may reunite ahead of Maharashtra’s upcoming local body elections.
Ajit Pawar Solapur politics : राजन पाटील-यशवंत मानेंच्या धक्क्यानंतर अजितदादा सोलापुरात करणार मोठा भूकंप, 'या' बड्या नेत्याचं इन्कमिंग?

अरे जरा दिलदारपणा वाढवा. मनाचा मोठेपणा करा. आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना? मला सुरवातीला निवडून द्यायला पवारसाहेबच कारणीभूत आहेत ना? मी काय वरुन पडलो होतो का? हे कसं आपल्याला विसरता येईल. तुम्ही फार संकुचित विचारांचे राहू नका. बारामतीकरांनी विधानसभेला मला लाखांचं मताधिक्य दिलचं ना? असं सांगत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनाही बेरजेचे राजकारण करण्याचा संदेश या निमित्ताने दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Sharad Pawar and Sunil Tatkare
Sunetra Pawar
late Deputy CM Ajit Pawar
Parth Pawar Sunil Tatkare, Praful Patel
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com