Ajit Pawar : भाजपचे काम न करण्याच्या पक्षाच्या निर्णयामुळे चिंचवडमध्ये अजितदादांसमोर पेच

NCP Pimpri Chinchwad Politics : 2017 पर्यंत राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता होती. अजितदादा शहराचे कारभारी होते. ते म्हणतील त्याला ते पद तथा जबाबदारी मिळत होती. तसेच दादा म्हणतील ती पूर्वदिशा असे शहर राष्ट्रवादीत होते. कुठलाही पदाधिकारी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नव्हता. त्याअर्थाने त्यांची पक्षात दादागिरी होती.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News, 06 Oct : आगामी विधानसभेला चिंचवडची जागा पक्षाकडे घेऊन तिथे आमच्यापैकीच कोणी नवीन चेहरा उमेदवार दिला नाही, तर तुतारी फुंकू, असा इशारा या मतदारसंघातील अजित पवार राष्ट्रवादीच्या चार माजी नगरसेवकांनी गेल्या महिन्यात 25 तारखेला दिला.

त्यांना आता या मतदारसंघातील पूर्ण पक्षाचा पाठिंबा काल मिळाला. त्यामुळे त्यांच्या या संभाव्य बंडाला मोठी रसद मिळाल्याने या गटाचा हुरूप भलताच वाढला आहे. त्यामुळे आतापर्यंत आपले निमूट ऐकणाऱ्यांचेच ऐकून घेण्याची पाळी अजितदादांवर आली आहे.

चिंचवडमधील या बंडाच्या इशाऱ्याने अजित पवारांची काहीशी गोची केली आहे. कारण ही जागा भाजपचा तेथे आमदार असल्याने त्यांना सोडली, तर हा इशारा दिलेला गट उमेदवारी मिळाली, तर शरद पवार गटाची वाट धरणार आहे. दुसरीकडे ज्याचा जिथे आमदार त्याला ती जागा हे महायुतीचे (Mahayuti) जागावाटपाचे सूत्र ठरले असल्याने अजित पवार महायुतीचा धर्म पाळण्याचीच शक्यता आहे.

त्यामुळे दुसरीकडे चिंचवडची निवडणूक फिरवू शकेल, एवढी ताकद असलेला त्यांचा हा गट युतीच्या उमेदवाराचे काम करणार नाही. तसेच त्यांच्यापैकी कुणाला आघाडीने (शरद पवार राष्ट्रवादी) उमेदवारी दिली, तर तो त्यांच्यामागे उभा राहणार राहणार आहे. कारण तसे काल अजित पवार राष्ट्रवादीच्या चिंचवडमधील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरले.

Ajit Pawar
Ajit Pawar : अजितदादा म्हणाले, भारावून गेलो... मनापासून आभार..!

बंडाचे निशाण फडकावलेल्या चार नगरसेवकांना बळ देण्यासाठी ती काल झाली. आमदारकीला इच्छूक वरील चार नगरसेवकांसह पाचवे इच्छूक माजी नगरसेवक नाना काटे हे ही यावेळी उपस्थित होते. भाजपचे काम न करण्याचे या बैठकीत ठरल्याचे काटेंनी सरकारनामाला थोड्या वेळापूर्वी सांगितले.

अजितदादांचे वरील चार माजी नगरसेवक नुकतेच शरद पवारांना (Sharad Pawar) पुण्यात भेटून आले आहेत. चिंचवडची जागा आघाडीत कोणाला सुटते त्यानंतर बोलू, असे त्यांना पवारसाहेबांनी सांगितले आहे. त्यानंतर आता या गटाला चिंचवड मतदारसंघातील पूर्ण पक्षाचा पाठिंबा काल मिळाल्याने त्यांना आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये महायुतीत उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे.

Ajit Pawar
Amol Kolhe News : लक्षात ठेवा वेळ तुमची असेल तर येणारा काळ आमचाच; अमोल कोल्हेंनी दिला इशारा

ही जागा पक्षाकडे घेण्याची मागणी केलेला गट अजितदादांना आता भेटणार आहे. त्यांना उद्याची वेळ दादांनी दिली आहे. त्यात काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. कारण त्यावरच चिंचवडमध्ये युतीत बंड होणार की नाही, हे ठरणार आहे.

दरम्यान, 2017 पर्यंत राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता होती. अजितदादा शहराचे कारभारी होते. ते म्हणतील त्याला ते पद तथा जबाबदारी मिळत होती. तसेच दादा म्हणतील ती पूर्वदिशा असे शहर राष्ट्रवादीत होते. कुठलाही पदाधिकारी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नव्हता. त्याअर्थाने त्यांची पक्षात दादागिरी होती.

ऐकून घेण्याची वेळ का आली अजिदादांवर?

पण, 2017 ला भाजप (BJP) पिंपरी पालिकेत सत्तेत आली. शहराला नवे कारभारी (भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे,चिंचवडचे लक्ष्मण जगताप) मिळाले. तर, नुकत्याच झालेल्या लोकसभेला अजितदादांच्या पक्षासह महायुतीचा महाराष्ट्रात पराभव झाला. त्यातून महाय़ुतीतून दादांना टार्गेट करण्यास सुरवात झाली.

त्यामुळे आक्रमक स्वभावाच्या दादा काहीसे मवाळ झाल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले. पूर्वी उद्योगनगरीत त्यांचे निमूट ऐकणारे त्यांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आता बंडाची भाषा करू लागले आहेत. परिणामी त्यांचेच ऐकून घेण्याची पाळी दादांवर आता आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com